जालना : राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील भाग्यनगर येथील शिक्षक पतसंस्था कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबिरात ३४ जणांनी रक्तदान केले. यात १२ महिला शिक्षिकांचा समावेश आहे. प्रथम राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक परिषदेचे विभागीय कोषाध्यक्ष भगवान जायभाये जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल रायसिंग, कार्यालयीन मंत्री सुनील ढाकरके, महिला आघाडीच्या जिल्हा मार्गदर्शिका सरला पवार, जिल्हाध्यक्षा वैशाली कुलकर्णी, सुरेखा आंधळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष मंगेश जैवाळ, कार्यवाह विकास पोथरे, सुनील ढाकरके, जगन्नाथ शिंदे, रवि तारो, संजय जाधव, सुनील साबळे, श्रीकांत रूपदे, संतोष देशपांडे, निलेश सोमवंशी यांनी प्रयत्न केले.