गंगाराम आढाव , जालना जालना लोकसभा मतदारसंघात २००४ व २००९ या दोन निवडणुकीपेक्षा २०१४ च्या निवडणुकीत १ लाख १३ हजारांनी मतदारांची संख्या वाढली. गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाचे २ लाख ४० हजार तर काँग्रेस आघाडीचे ४२ हजार मतदार वाढले आहे. जालना लोकसभा मतदारसंघात २००४ च्या निवडणुकीत भाजपाला ३ लाख ७९ हजार ६३० मते तर काँग्रेसला ३ लाख ८ हजार २९८ मते मिळाली होती. ६१ हजार ३३२ मतांनी भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे पाटील यांचा विजय झाला होता. तर काँग्रेसचे उत्तमसिंह पवार यांना पराभव पत्करावा लागला. २००९ च्या निवडणुकीत भाजपाला ३ लाख ५० हजार ७१० मते मिळाली तर काँग्रेस पक्षाला ३ लाख ४२ हजार २२८ मते मिळाली होती. सुमारे ८ हजार मतांनी भाजपा उमेदवार दानवे यांचा विजय झाला. या पार्श्वभूमीवर २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला ५ लाख ७९ हजार ११३ मते मिळाली तर काँग्रेसला ३ लाख ८७ हजार ४०६ इतकी मते मिळाली. म्हणजेच काँग्रेसच्या पारड्यात मागील निवडणुकीपेक्षा ४५ हजार मते अधिक पडली. विशेष म्हणजे या निवडणुकीत मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघ काँग्रेस आघाडीकडे होते. त्यामुळे काँग्रेची बाजू भक्कम समजली जात होती. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसला विधानसभांमध्ये आघाडी घेता आली नाही. त्यामुळे पराभवाला समोरे जावे लागले. भाजपा क्रमांक १ चा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस दुसर्या क्रमांकावर राहिला आहे. तिसर्या क्रमाकांवर बहुजन समाज पक्ष राहिला. मात्र, मतदारांत मोठी घट झाली आहे. मागील निवडणुकीत ३५ हजार ९७६ मते या पक्षाने घेतली होती. तर त्याआधी २००४ च्या निवडणुकीत १७ हजार मते घेतली होती. परंतू या निवडणुकीत दुरंगी लढत झाल्याने अन्य उमेदवारांना कमी प्रमाणात मते मिळाली. जालना लोकसभा मतदारसंघात या निवडणुकीत सुमारे एक लाख नवीन मतदार वाढले होते. या मतदारांत मतदानाच्या हक्काविषयी कमालीच्या जाणीवा निर्माण झाल्या होत्या. तसेच मतदान करण्यासंबधी जिल्हा प्रशासनाने तसेच सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्याने मतदानाची टक्केवारीही वाढली. याचा फायदा भाजपाला मिळणार हे स्पष्ट होते. मतमोजणीतून ते चित्र समोर आले असून नव्या पिढीने भाजपालाच पसंती दिली. या दोन्ही निवडणुकीत या पक्षाला पडलेल्या मतांचा फटका काँग्रेस पक्षाला बसला होता. यावेळेस २०१४ च्या निवडणुकीत या पक्षाला २३ हजार म्हणजे मागील निवडणुकीपेक्षा कमी मते मिळाली आहे. त्यांना मिळालेल्या मतांचा कुठलाही राजकीय परिणाम झालेला नाही. समाजवादी पार्टीच्या मताही थोडी झाली आहे. या पार्टी २००९ मध्ये १५५४ मते मिळाली होती.
भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली
By admin | Updated: May 18, 2014 00:45 IST