शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज-रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:38 IST

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात भाजपाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, ही निवडणुक पक्ष विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचे सांगून अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा देखील भाजपाच्या समोर असल्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील निवास्थानी पत्रकाराशी बोलताना सांगितले़

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदार संघात भाजपाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, ही निवडणुक पक्ष विकासाच्या मुद्यावर लढविणार असल्याचे सांगून अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा देखील भाजपाच्या समोर असल्याचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष खा़रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील निवास्थानी पत्रकाराशी बोलताना सांगितले़दिपावली स्रेहमिलनाच्या कार्यक्रमानंतर खा़ दानवे यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेद्र मोदी व अमीत शहा यांच्या नेत्तृत्वाखाली लोकसभेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्यात येणार आहेत, मोदी यांना दुस-यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडूण जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या चांगल्या कामाचा मुद्दा निवडणुकीत समोर ठेऊन पक्ष संघटन कामाला लागले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजप, सेनेची युती होती मात्र त्यानंतर विधानसभेच्यावेळी युती तुटली होती या वेळी निवडणुक युतीने लढवावी ही भाजपाची इच्छा आहे, मात्र मित्रपक्षाची आद्याप भूमीका स्पष्ट नाही. त्यामुळे आम्ही राज्यातील सर्व ४८ मतदार संघामध्ये तयारी केली आहे. युती झाली तर आम्ही केलेली तयारी त्यांच्यासाठी उपयोगी पडेल जर नाही झाली तर मात्र आम्हांला लढण्याची तयारी करणे आवश्यक आहे, असे दानवे यांनी सांगून आपण गेल्या आठवड्यामध्ये गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या मतदार संघाचा दौरा केला असून, सध्या जळगाव, धुळे, नंदूरबार, दिंडोरी, रावेर, नाशिक, पालघर, ठाणे या लोकसभा मतदार संघात आपला पक्ष संघटनाच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दौरा सुरू असल्याचे दानवे यांनी सांगितले़ संध्या दुष्काळी परिस्थीती असल्यामुळे सरकार हे शेतक-याच्या पाठीमागे खंभीरपणे उभे असुन वेळ प्रंसगी सरकारची तिजोरी रिकामी करावी लागली तरी सरकार मागे हटणार नाही असे दानवे यांनी सांगुन या निवडणुकीत भाजप विकास कामावर निवडणुक जिंंकेल मात्र त्याच बरोबर पक्षाने राम मंदिराचा प्रश्न सुध्दा सोडला नसल्याचे ते म्हणाले.समोरून कोण उमेदवार येईल यांची चिंंता नाही़पत्रकारानी आपण राज्याच्या दौ-यावर असतात मग जालना लोकसभा मतदार संघाकडे कसे लक्ष देणार अशी विचारणा केली असता, दानवे म्हणाले की आपण जमीनीवर पाय ठेऊन चालणारे कार्यकर्ता आहोत. त्यामुळे आपण कोठेही असलो तरी लक्ष मात्र जालना लोकसभा मतदार संघावरच असते. या मतदार संघात ६ हजार कोटीच्या रस्त्याची कामे सुरू आहेत, अनेक महत्वाचे प्रकल्प मंजुर झाले आहेत, शिवाय आपण मतदारांच्या कायम संपर्कात असतो त्यामुळे समोरून कोण उमेदवार येईल यांची आपल्याचा चिंंता नाही, या मतदार संघातील ८० टक्के निवडणुकीचे काम पूर्णत्वाकडे आल्याचे दानवे यांनी सांगितले़

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेElectionनिवडणूक