रिक्षास धक्का लागल्याने एकास मारहाण
जालना : म्हशीचा रिक्षास धक्का बसल्याने एकास तिघांनी मारहाण केल्याची घटना परतूर तालुक्यातील कुरेशी मोहल्ला येथे सोमवारी घडली. याप्रकरणी शेख बाबा शेख दगडू यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजीज अन्सारी, अंकित अन्सारी, अजीम अन्सारी (सर्व रा. कुरेशी मोहल्ला परतूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील पोना लालझरे हे तपास करीत आहेत.
आदेशाचे उल्लंघन : दोघांविरुद्ध गुन्हा
जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून ब्रेक द चेन अंतर्गत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असतानाही बदनापूर येथील एका दुकानदाराने आपले दुकान सुरू केले. याप्रकरणी आकाश कुरील यांच्या फिर्यादीवरून रेणुकादास सुभाष काटकर, सुमित राजेंद्र जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोउपनि. खंडागळे यांनी केला.