शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मोठी बातमी! वेळ देणार पण जागा सोडणार नाही, मनोज जरांगेंच्या शासनाला पाच अटी

By विजय मुंडे  | Updated: September 12, 2023 15:24 IST

मनोज जरांगे : कायद्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो, तज्ज्ञांचे म्हणणे

जालना/वडीगोद्री : तज्ज्ञ, अभ्यासक आणि शासनाच्या म्हणण्यानुसार मराठा आरक्षण हे कायदेशीर प्रक्रिया आहे. कायद्याची प्रक्रिया मोठी असते त्यामुळे शासनाला वेळ देणे गरजेचे आहे. आजवर ४० वर्ष दिले आहेत. आणखी एक महिन्याने काही फरक पडणार नाही. आपण शासनाला एक महिन्याचा वेळ देऊ. परंतु मराठा समाजातील शेवटच्या घटकाच्या हातात प्रमाणपत्र पडेपर्यंत मी ही जागा सोडणार नाही, असे अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी सांगितले.

अंतरवाली सराटीतील उपोषणाच्या  पार्श्वभूमीवर मुंबई येथे पार पडलेल्या सर्व पक्षीय बैठकीत जे ठराव, निर्णय झाले त्याची माहिती घेऊन माजी मंत्री अर्जुन खोतकर, रोहयोमंत्री संदिपान बुमरे यांनी मंगळवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे मनोज जारांगे यांची भेट घेऊन शासनाचे पत्र दिले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मराठा आरक्षण आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणे, अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय झाला आहे. परंतु आरक्षणाचा विषय राहिला आहे. सर्वपक्षीयांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास पाठिंबा दिला आहे. आपल्याला कायम टिकणारे आरक्षण हवे आहे. आरक्षणाच्या कायद्याची प्रक्रिया मोठी आहे. अभ्यासक, तज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यासाठी वेळ द्यावा लागतो. एक दिवसात जीआर निघाला तर तो टिकणार नाही. आपण शासनाला एक महिन्याचा वेळ देऊ. परंतु आरक्षण मिळेपर्यंत आपण ही जागा सोडणार नाही आणि ३१ व्या दिवसानंतर आरक्षण मिळाल नाही तर महाराष्ट्राची बॉर्डर एकाही मंत्र्याला क्रॉस करू देणार नाही. एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची यात्रा निघेल, यावर यावर मी ठाम असल्याचे ते म्हणाले.

ग्रामस्थांनी हात वर करून दिले समर्थनमनोज जरांगे यांच्या निर्णयाला अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी उपस्थित समाज बांधवांनी हात वर करून समर्थन दिले. त्यानंतर जरांगे यांनी पाच अटी ठेवल्या. समितीचा अहवाल कसाही येवो ३१ व्या दिवशी महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्र वाटप करायचे. राज्यात दखल सर्व गुन्हे मागे घ्यावेत, लाठीमार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करावे,  उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यावे, छत्रपती संभाजी राजे भोसले, उदयन राजे भोसले यांना शासन आणि उपोषण कर्त्यांच्या मध्ये ठेवावे, सरकारने हे सर्व लेखी द्यायवे हे मुद्दे जरांगे यांनी मांडले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाState Governmentराज्य सरकार