शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

मोठा अपघात सुदैवाने टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:43 AM

खडी भरून घेऊन जाणा-या एका टिप्परने बसला मागून धडक दिल्याने बसचे नुकसान झाले. तसेच बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.

भोकरदन : खडी भरून घेऊन जाणा-या एका टिप्परने बसला मागून धडक दिल्याने बसचे नुकसान झाले. तसेच बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. तालुक्यातील कुंभारी फाटा परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली.भोकरदन ते हसनाबाद ही बस नेहमीप्रमाणे भोकरदन बस स्थानकातून दुपारी निघाली. कुंभारी फाट्याजवळ आल्यानंतर हसनाबादकडून खडी घेऊन येणारा भरधाव टिप्पर बसच्या अगदी जवळून गेला. त्यामुळे ट्रकचे एक हुक बसच्या मागील खिडकीत अडकले. त्यामुळे खिडकी तुटली. चालक श्रीराम कड यांनी प्रसंगावधान राखत बस वेळीच थांबवली. सुदैवाने तुटलेल्या खिडकीजवळ कुणीच बसलेले नसल्यामुळे जीवित हानी टळली. बसमधील १८ प्रवासी बालंबाल बचावले. या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे दोन्ही वाहनांची धूळ उडाल्याने काहीच न दिसल्यामुळे हा अपघात घडल्याचे वाहक किशोर दाभाडे यांनी सांगितले. त्यानंतर सर्व प्रवाशांना दुस-या बसमध्ये पाठविण्यात आले. या प्र्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा नोंद नव्हता.