शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भोकरदन तालुका लघु पशुचिकित्सालयाचा कारभार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:57 IST

फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यातील पशूंवर उपचार करण्यासाठी राज्य शासन व जिल्हा परिषद अशा दोन विभागामार्फत कामकाज करण्यात येते. मात्र भोकरदन तालुक्यातील राज्य शासनाच्या भोकरदन शहरासह तालुक्यातील सात पशु चिकित्सालयात जनावरांवर उपचार करण्यासाठी कर्मचारीच नसल्यामुळे भोकरदन येथे औषधोपचार करण्याची जबाबदारी चक्क सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यावर येऊन ठेपली आहे़भोकरदन ...

फकिरा देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन तालुक्यातील पशूंवर उपचार करण्यासाठी राज्य शासन व जिल्हा परिषद अशा दोन विभागामार्फत कामकाज करण्यात येते. मात्र भोकरदन तालुक्यातील राज्य शासनाच्या भोकरदन शहरासह तालुक्यातील सात पशु चिकित्सालयात जनावरांवर उपचार करण्यासाठी कर्मचारीच नसल्यामुळे भोकरदन येथे औषधोपचार करण्याची जबाबदारी चक्क सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यावर येऊन ठेपली आहे़भोकरदन - जालना रस्त्यावर राज्य शासनाच्या वतीने तालुका लघु पशु सर्व चिकित्सालयाची इमारत दोन कोटी रूपयांपेक्षा अधिक खर्च करून बांधली आहे. शिवाय जनावरांच्या शस्त्रक्रियेसह सर्व उपचार करण्याची यंत्रसामुग्री या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून धूळ खात पडून आहे़ त्याचप्रमाणे तालुक्यातील धावडा, वालसावंगी, सिपोरा बाजार, आव्हाना, केदारखेडा, दानापूर येथील राज्य शासनाच्या श्रेणी दोनच्या सर्वच चिकित्सालयातील पदे रिक्त आहेत. त्यामध्ये धावडा, आव्हाना, केदारखेडा येथे एकच शिपाई कार्यरत आहे. भोकरदन सारख्या तालुक्याच्या ठिकाणी सहायक आयुक्त पशुधन, आदी अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने पशुपालकांचे मोठे हाल सुरू आहेत. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहेत.जिल्हा परिषदेचे पशुधन विकास अधिकारी डॉ. रोहित धुमाळ यांनी सांगितले की, मी चार वर्षापासून येथे आलो. तेव्हापासून राज्य शासनाची सर्वच पदे रिक्त आहेत. केवळ बी़जी़ रावते हे एकमेव कर्मचारी कार्यरत होते. मात्र ते सुध्दा सेवानिवृत्त झाले आहेत़ त्याच प्रमाणे इमारत व यंत्रसामग्री हाताळण्यासाठी अधिकारी, कर्मचारीच नााहीत. शिवाय आम्ही त्या इमारतीचा किवा यंत्रसामुग्रीचा वापर करू शकत नाही, असे सांगितले. जुन्या इमारतीमध्ये आमचे कार्यालय सुरू असल्याचे सांगण्यात आले. या महत्त्वाच्या दवाखान्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMedicalवैद्यकीय