शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
2
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
3
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
4
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
5
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
6
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
7
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
8
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
9
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
10
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
11
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
12
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
13
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
14
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
15
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
16
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
17
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
18
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
19
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
20
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

धावडा येथील जगदंबा देवी स्वारी उत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:23 IST

भोकरदन तालुक्यातील धावडा येथे होळीच्या पाचव्या दिवसापासून पारंपारिक आई जगदंबा देवी स्वारी उत्सवास प्रारंभ होते. दोनशे वर्षाची परंपरा असलेला हा उत्सव यंदाही सोमवारपासून पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथे होळीच्या पाचव्या दिवसापासून पारंपारिक आई जगदंबा देवी स्वारी उत्सवास प्रारंभ होते. दोनशे वर्षाची परंपरा असलेला हा उत्सव यंदाही सोमवारपासून पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जाणार आहे.धावडा येथील भवानी चौकातील आई जगदंबा देवीचे मंदिर असून, ही देवी दक्षिणमुखी आहे. नवसाला पावणारी ही देवी एका रात्रीतून प्रकटल्याची आख्यायिका सांगितली जाते. येथील स्वारी उत्सवास लेकीबाळींसह राज्याच्या कानाकोप-यातून भाविक दर्शनासाठी आवर्जून येतात. यात मराठवाडा, खान्देश, विदर्भातूनही स्वारी उत्सवाला येणाºया भाविकांची संख्या अधिक असते. सुवासिनी नारळाने, सव्वाशेर गुळ, चांदीचे डोळे, समई, पाळण्याने देवीची ओटी भरतात. ५ मार्च रोजी सुरू होणाºया या स्वारी उत्सवाची सांगता ६ मार्चच्या पहाटे ५ वाजता होणार आहे. उत्सवाची तयारी म्हणून ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. बैठकीत स्वारीनिमित्त निघणारी विविध देवीदेवतांचे सोंग कोणी घ्यायचे, हे ठरविण्यात आले. या स्वारीतील मुख्य आकर्षण असते ते म्हणजे चोराला फाशी देण्याचे सोंग. अंगावर शहारे आणणारे भाल्याने फाशी देण्याचे हे सोंग रात्री दोन ते तीन वाजता दरम्यान होते.देवी उत्सवानिमित्त दोन दिवसात गावात भक्तीमय वातावरण असून, गावाला यात्रेचे स्वरुप आले आहे.निजामाकडूनमिळायचा खर्चस्वारीच्या दिवशी महिला घरासमोर सडा, रांगोळी काढतात. गेल्या अनेक वर्र्षांपासून देवीची स्वारी सरपंच बेलाअप्पा पिसोळे हे घेत आहेत. चोराचे सोंग राजू टेंभरे हे घेतात. हे सोंग मोठ्या जिकिरीचे असून त्याला भाल्याने फाशी दिली जाते. ते जिवावर बेतण्यासारखे असते. यापूर्वी हा स्वारी उत्सव आठवडाभर चालत असते. या उत्सवासाठी पूर्वी निजाम राजवटीत हैदराबाद येथून १०० रुपये शासकीय खर्च येई, असे जुन्या जाणकारांनी सांगितले.