उभी केलेली दुचाकी लंपास
जालना : शहरातील गोकूळधाम सोसायटी येथे उभी केलेली १० हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केल्याची घटना २ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी १ फेब्रुवारी रोजी भगवंत सुधाकर आकोलकर यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लक्ष्मीनारायणपुरा येथे चोरी
जालना : घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरातील सीसीटीव्ही, डीव्हीआर व एअरटेल कंपनीचा टीव्हीचा सेटअप बॉक्स असा ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २९ जानेवारीच्या मध्यरात्री शहरातील लक्ष्मीनारायणपुरा येथे घडली. याप्रकरणी भानुदास गावंडे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना घुगे हे करीत आहेत.
वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
जालना : मंठा येथील नानसी ते तहसील कार्यालयाकडे जाणा-या रस्त्यावर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणा-या ट्रॅक्टरला पोलिसांनी पकडले. या प्रकरणी प्रल्हाद धोंडीबा देशमुख यांच्या फिर्यादीवरून प्रमोद संदीपान गोरे (रा. विडोळी ता. मंठा. जि. जालना) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास राठोड हे करीत आहेत.
रोहिलागड येथे चर्चासत्र मेळावा
अंबड : अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे डाळिंब, मोसंबी व बटाटा उत्पादक शेतक-यांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पिकावरील रोग व कीड व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन, निर्यातक्षम उत्पादन तसेच नवीन तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला तांत्रिक मार्गदर्शक म्हणून डॉक्टर गणेश वाकळे, प्रफुल्ल काटे, बाबासाहेब पितळे, सोपान टकले, भास्कर टकले, बाबासाहेब टकले, भीमराव मगरे यांच्यासह शेतक-यांची उपस्थिती होती.