शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! जमिनीचा पोत खालावतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:09 IST

‘धरणी माता तुम्हाला घालती साद, आरोग्य तिचे रक्षुनिया द्या तिला प्रतिसाद’, असे शेतकºयांना सांगण्याची वेळ आता कृषी विभागावर आली आहे. रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जमीन सतत पिकांखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर यामुळे जिल्ह्यातील जमिनीचा पोत खालावत चालला आहे.

ठळक मुद्देजागतिक मृदा दिन विशेष : सेंद्रीय घटकांचा वापर करण्याचा सल्ला, पोषक मूल्य आणि सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण घटले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ‘धरणी माता तुम्हाला घालती साद, आरोग्य तिचे रक्षुनिया द्या तिला प्रतिसाद’, असे शेतकºयांना सांगण्याची वेळ आता कृषी विभागावर आली आहे. रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जमीन सतत पिकांखाली राहणे, पाण्याचा अयोग्य वापर यामुळे जिल्ह्यातील जमिनीचा पोत खालावत चालला आहे.जमिनीत पिकांसाठी पोषक मूल्य व सुक्ष्म अन्न घटकांचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची घट, जमीन नापिक होणे, उत्पादनात घट येण्याच्या समस्या वाढल्या असून, ही धोक्याची घंटा असल्याचे मृद तज्ज्ञ सांगत आहेत.जालना जिल्ह्यातील जमीन मध्यम प्रकारची काळ्या मातीची आहे. ६२ टक्के जमीन ७५ टक्क्यांपेक्षा कमी खोलीची आहे. त्यामुळे पिके लवकर पाण्यावर येतात. जमिनीत पिकांसाठी आवश्यक असलेले स्फुरद, नत्र व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांचे प्रमाण १-१४० किलोग्रम प्रति हेक्टर असणे आवश्यक आहे.मात्र, माती परिक्षणामध्ये जिल्ह्यातील जमिनीमध्ये या अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी आढळून आले आहे. त्याचबरोबर लोह, जस्त, मॅग्निज, तांबे, बोरॉन, सल्फर या पिकांना आवश्यक असलेल्या सुक्ष्म अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी झाले असून, पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवरही परिणाम होत आहे. मातीची धूप वाढली आहे. त्यातच माती परीक्षणाशिवाय रासायनिक खतांचा केला जाणार भरमसाठ वापर जमिनीसाठी हानिकारक ठरत आहे. शेतकºयांनी खालावलेला जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शेणखत, गांडूळ खतांबरोबर सेंद्रीय खतांचा वापर वाढवावा, माती परिक्षण करून मृदा आरोग्य पत्रिकेच्या आधारे पिकांना खते द्यावीत, असा निकरीचा सल्ला मृद तज्ज्ञांकडून दिला जात आहे.दोन लाख मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप४जालना येथील खरपुडी कृषी विज्ञान केंद्रातील भूमी आरोग्य चिकित्सालय आणि कृषी विभागाच्या माध्यमातून मागील काही वर्षांमध्ये जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये मृदा परीक्षणाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कृषी विज्ञान केंद्रामार्फत दोन लाख शेतकºयांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे.४या आरोग्य पत्रिकेतील सल्ल्यानुसारच शेतकºयांना कोणत्या पिकांसाठी किती प्रमाणात खतांचा वापर करावा, याची शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ राहुल चौधरी यांनी सांगितले.