शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंच्या फिरकीसमोर अधिकाऱ्यांची भंबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 01:04 IST

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महत्त्वाच्या विभागांच्या बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवरून अधिकाऱ्यांची चांगलीच फिरकी घेतल्याने अधिका-यांची भंबेरी उडाल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महत्त्वाच्या विभागांच्या बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवरून अधिकाऱ्यांची चांगलीच फिरकी घेतल्याने अधिका-यांची भंबेरी उडाल्याचे दिसून आले. अनेक प्रकरणांमध्ये समाधानकारक उत्तरे न देता आल्याने दानवे जाम चिडल्याचे दिसून आले. कामांमध्ये सुधारणा करून त्यांची गती वाढविण्याचे निर्देश दानवे यांनी उपस्थित यंत्रणेतील अधिका-यांना दिले.ब-याच महिन्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. दुपारी एक ते चार यावेळेत जिल्हा ग्रामीण यंत्रणेसह वीज वितरण कंपनीच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्यासह विविध विभागांच्या खाते प्रमुखांची उपस्थिती होती. प्रारंभी पंडित दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास अभियानाचा आढावा घेताना संबंधित विभागाने सांगितले की, जिल्ह्यातील जवळपास १३९९ सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण दिले आहे, त्या पैकी १२३९ जणांना नोकरी लागल्याचे सांगितले. यापैकी एका तरी व्यक्तीचा आणि तुमचा संपर्क झाला का असा सवाल करून किमान तुम्ही म्हणजेच जिल्हाधिकारी आणि सीईओंनी आढावा घेतला काय, असे विचारल्यावर अधिकारी निरुत्तर झाले.वीज वितरण कंपनीच्या एकूणच कामकाजाबद्दल दानवेंनी नाराजी व्यक्त केली. डीपी दुरूस्तीच्या नावाखाली जो गोंधळ सुरू आहे, त्यात सूत्रता आणण्यासाठी ही सर्व कामे आॅनलाईन कसे करता येतील यावर विचार करण्याचे त्यांनी सांगितले. डीपी दुरूस्तीसाठी शेतक-यांची होणारी ससेहोलपट त्यांनी बैठकीत त्यांच्या खास शैलीत सांगितली. विद्युत केंद्र उभारणीची मुदत संपूनही अनेक ठिकाणी या कामांना प्रारंभ न झाल्याबद्दल संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. एकूणच संबंधित कंत्राटदारांना अधिकारी पाठीशी घालत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक अभियंत्यांसह अनेक अधिकारी हे त्यांचे मोबाईल घेत नसल्याच्या नागरिकांच्या तक्ररी असल्याचे त्यांनी नमूद केले. यासह पंतप्रधान सडक योजनेच्या कामांचा उडालेला बोजवारा, पाणंद रस्ते आणि त्यांची रखडलेली कामांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तसेच सीईओंना बैठकीत दिले. कृषी विभागावरही त्यांनी रोष व्यक्त केला. बजाज अ‍ॅलायंज कंपनीने कृषी विमा भरण्यासाठी करार न केल्या प्रकरणी अधिका-यांनी आम्हांला अंधारात ठेवल्याचे सांगून याबद्दल आता पुढील महिन्यातील ८ तारखेला दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा मुद्दा निकाली काढण्याचे ते म्हणाले.उडवाउडवीच्या उत्तरांनी अचंबितजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेत घनसावंगीत १९८ जणांना प्रश्क्षिण दिले. अन् नोकरी १९९ जणांना लागल्याचे दानवेंना दिलेल्या माहिती पुस्तिकेत नमूद केल्याच्या मुद्यावरून मोठा गोंधळ उडाला. दानवेंनी या मुद्यावरून अधिका-यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली.सिंचन क्षमता वाढविण्यासाठी मनरेगातून सिंचन विहिरींची अपूर्ण कामांवरूनही दानवेंनी अधिका-यांना जाब विचारला. यात पूर्वीच्या ९९९ विहिरी अपूर्ण असून, नवीन एक हजार ५०० विहिरींना मंजुरी मिळूनही त्यांची कामे सुरू न झाल्याबद्दल खंत व्यक्त करून ते तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच अधिका-यांच्या उत्तरांनी अनेकांना अचंबित केले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाgovernment schemeसरकारी योजना