शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराअभावी बाळ दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 01:37 IST

ग्रामीण रूग्णालयात नाजमाबी मुजाहेद पठाण या महिलेला प्रसुतीच्या वेदना तीव्र होत असल्याने उपचारासाठी २५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र, वेळेत रूग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातच बाळ दगावल्याची तक्रार महिलेचे पती मुजाहेद समशेरखान पठाण यांनी जि. प. च्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : येथील ग्रामीण रूग्णालयात नाजमाबी मुजाहेद पठाण या महिलेला प्रसुतीच्या वेदना तीव्र होत असल्याने उपचारासाठी २५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र, वेळेत रूग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातच बाळ दगावल्याची तक्रार महिलेचे पती मुजाहेद समशेरखान पठाण यांनी जि. प. च्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.नाजमाबी मुजाहेद पठाण ही महिला प्रसुतीसाठी रूग्णालयात आली असता, त्यांच्यावर येथे उपचार होणार नसल्याचे सांगून तुम्ही त्या महिलेला जालना अथवा अन्यत्र हलवा अशी सूचना उपस्थित वैद्यकीय कर्मचा-यांनी केली. त्यावेळी रूग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णवाहीका देण्याची मागणी केली. मात्र रूग्णवाहीका नादुरूस्त असल्याचे कारण सांगून टाळाटाळ केल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गतची रूग्णवाहिका रूग्णालयात उभी होती, मात्र ती नादुरूस्त असल्याची माहिती डॉ. रमेश हरणे यांनी दिली. रूग्णवाहिका उपलब्ध होण्यातच रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा एक ते दीड तास खर्ची झाला. नंतर रूग्णाला खाजगी वाहनाने जालन्याकडे नेले जात असतानाच जाफराबाद ग्रामीण रूग्णालयात उभी असलेली रूग्णवाहीका दुस-या रूग्णाला घेऊन जालन्याला गेल्याचा आरोप नाजमाबी मुजाहेद यांच्या पतीने तक्रारीत केला आहे.रूग्णालयातील हलगर्जीपणा करणा-या अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाईची मागणीही तक्रारीत केली आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयDeathमृत्यू