मारूती मंदिरासाठी साऊंड सिस्टिम भेट
भोकरदन : तालुक्यातील वरूड बुद्रुक येथील हनुमान मंदिरासाठी ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता, सामाजिक कार्येकर्ते दिलीप वाघ यांनी सोळा हजार रुपयांचे साऊंड सिस्टिम भेट दिले आहे. यामुळे भजनी मंडळी व संस्थानचा प्रश्न मार्गी लागला आहे. तालुक्यातील वरुड बु. येथे जागृत हनुमान मंदिर आहे. परंतु, या मंदिरावर साऊंड सिस्टिमअभावी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम घेताना ग्रामस्थांना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे साऊंड सिस्टिम द्यावी, अशी मागणी येथील भजनी मंडळी व ग्रामस्थांनी दिलीप वाघ यांच्याकडे केली होती.
एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत यश
जालना : जुना जालना भागातील बाबुराव जाफराबादकर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश देशपांडे याने एनएमएमएस परीक्षेत यश प्राप्त करून शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे. याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजीव देशपांडे, सचिव चंद्रशेखर वाघमारे, डॉ. विनायक दसरे, मुख्याध्यापिका मीनाक्षी कुलकर्णी, संदीप इंगोले, अलकनंदा गाडेकर, काटे, वंदना नन्नवरे, भीमाशंकर जवळेकर, मदन सोजे आदी उपस्थित होते.
पाथ्रुड बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी
जालना : तालुक्यातील पाथ्रुड बससेवा मागील दीड वर्षापासून बंद असल्याने परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत असून, नाईलाजाने खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. जालना आगाराने ही बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. पाथ्रुडला बस सुरू केल्यास परिसरातील नेर, शिवणी, पाहेगाव, मानेगाव, दहिफळ, सावंगी, उखळी, धारा, उमरी आदी ठिकाणच्या प्रवाशांची सोय हाेईल, अशी मागणी बालासाहेब देशमुख, गणपत आढे, नितीन जोशी, विठ्ठल दंग, अमोल देशमुख आदींनी केली आहे.
काळेगाव परिसरात रिमझिम पाऊस
जालना : तालुक्यातील काळेगाव येथे मागील तीन ते चार दिवसांपासून पाऊस होत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. परिसरात अनेक नदी नाल्यांना पाणी आले. काही ठिकाणी पावसाचे पाणी शेतात साचल्याने पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी शेतजमीन खरडून गेली. या पावसाने परिसरातील साठवण तलाव, पाझर तलाव, विहिरीत जलसाठा झाला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश
जालना : येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झाली. संभाजी डव्हारे, दत्ता कावळे या दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. संस्थापक अध्यक्ष भगवानराव काळे, ॲड. त्र्यंबक पिसुरे, मुख्याध्यापिका ए. एम. शिरसवाल, प्रा. एस. एम. वाघ, व्ही. एस. वाकडे आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विलास साबळे यांची निवड
जालना : जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने अध्यक्ष दिनकर घेवंदे यांनी बदनापूर तालुका उपाध्यक्षपदी विलास साबळे यांची नियुक्ती केली. यावेळी सुभाष मगरे, प्रमोद साबळे, विकास रगडे, लक्ष्मण मसलेकर, मोबीन खान, अनवर आतार, दीपक कायंदे आदी उपस्थित होते.