लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पत्नीसह सकाळी मॉर्निग वॉकला गेलेल्या एका व्यापा-यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना गुरूवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास सिंदखेडराजा चौफुली येथील वन विभागाच्या उद्यानाजवळ घडली. यात व्यापारी विमलराज सिंघवी हे जखमी झाले आहे. दरम्यान, हल्ला कशाने केला, याचा तपास पोलीस करीत असल्याचे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी सांगितले.व्यापारी विमलराज सिंघवी हे आपल्या पत्नीसह सिंदखेड राजा चौफुली येथे मॉर्निंग वॉकला जात होते. वन विभागाच्या प्रवेशद्वारा जवळ आल्यावर त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला.यात विमलराज सिंघवी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर त्यांच्या पत्नीला किरकोळ मार लागला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी भेट दिली असून, हल्ला कशाने झाला याचा तपास पोलीस करीत आहे. दरम्यान, गोळीबार झाल्याची चर्चा दिवसभर शहरात होती. परंतु, पोलिसांनी गोळीबार झाला नसल्याचे सांगितले.
वन विभाग परिसरात व्यापाऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:18 IST