शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

शॉर्टसर्किटमुळे स्वप्नांची राख; पूर्ण वाढलेला ११ हेक्टर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 14:00 IST

Fire in farm field : आगीने रौद्ररूप धारण करून परिसरातील ४ ते ५ गटातील जवळपास ११.७२ हेक्टर उसाला आपल्या कवेत घेतले.

ठळक मुद्देमहावितरणने गंभीर न घेतल्याने आग लागल्याचा आरोप शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

टेंभुर्णी (जि.जालना) : जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे उसाला आग (11 hectares of fully grown sugarcane burn ) लागली. या आगीत कुंभारझरी शिवारातील १४ शेतकऱ्यांचा ११.७२ हेक्टर ऊस जळून खाक झाला आहे. दरम्यान, वेळोवेळी सांगूनही विजेची तारे सरळ न करणाऱ्या वीज वितरण प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास येथील गट क. ९२ मधील शेतकरी विनायक चव्हाण यांच्या उसाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण करून परिसरातील ४ ते ५ गटातील जवळपास ११.७२ हेक्टर उसाला आपल्या कवेत घेतले. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांनी या शेतांकडे आग नियंत्रित आणण्यासाठी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांना ही आग नियंत्रित आणण्यात यश आले. या आगीत जवळपास १ हजार ५०० टनांपेक्षा अधिक ऊस जळून खाक झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून, त्यात ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अद्याप परिसरात कुठेही साखर कारखाने सुरू नसल्याने या संपूर्ण उसाचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागणार आहे. दरम्यान, या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

तीन वर्षांपूर्वीही लागली होती आगतीन वर्षांपूर्वीही याच ठिकाणी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे उसाला लागलेल्या आगीत ६० ते ७० एकर ऊस जळून खाक झाला होता. तेव्हा ऊस जळूनही वीज वितरणाने या प्रकरणाला गांभीर्याने न घेतल्याने पुन्हा ही दुर्घटना घडली, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी बोलून दाखवित आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना