टेंभुर्णी : सुखी संसाराची स्वप्ने रंगवीत असतानाच एका भावी नवरदेवाचा अचानक मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना शुक्रवारी सकाळी घडली.जाफराबाद तालुक्यातील डावरगाव देवी येथील विनोद अशोक मगरे (२५) याचे ७ मे रोजी लग्न ठरले होते. लग्न पत्रिका वाटण्यापासून सर्व पुर्वतयारी विनोद स्वत:च करीत होता. अगदी गुरूवारपर्यंत त्याने पाहुण्यांच्या गावोगावी जावून पत्रिका वाटल्या. लग्न घटीका अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपली होती. तिकडे सिनगाव जहांगीर (ता. देऊळगांवराजा) येथे विनोदची भावी पत्नीही आपल्या संसाराची स्वप्ने रंगवीत होती.पण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. गुरुवारी दिवसभर उन्हात पत्रिका वाटून झोपी गेलेला विनोद शुक्रवारी सकाळी प्रात:विधीला गेला. तेथेच तो जमिनीवर कोसळला तो कायमचाच. मित्रमंडळींंनी धावपळ करीत विनोदला दवाखान्यात नेले. पण डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. शुक्रवारी दुपारी विनोदवर शोकाकुल वातावरणात डावरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.टेंभुर्णी : आईचा आधार गेलाविनोदच्या वडिलाचे तो लहान असतानाच निधन झाल्याने बहिणीच्या विवाहानंतर तो आपल्या आईचा एकमेव आधार होता. घरची परिस्थिती बेताचीच असलेल्याने विनोद ड्रायव्हिंग व मजुरी करून उदरनिर्वाह चालवायचा. आता आई निर्मलाबाईंचा म्हातारपणीचा एकमेव आधार गेल्याने त्यांचा हंबरडा उपस्थितांचे डोळे ओले करीत होता.त्याच्या अचानक जाण्याने दोन्ही परिवारावर दु:खाचे संकट कोसळले आहे. गावातही विनोद मगरेच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत होती.
बोहल्यावर चढण्यापूर्वीच भावी नवरदेवाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:11 IST
सुखी संसाराची स्वप्ने रंगवीत असतानाच एका भावी नवरदेवाचा अचानक मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना शुक्रवारी सकाळी घडली.
बोहल्यावर चढण्यापूर्वीच भावी नवरदेवाचा मृत्यू
ठळक मुद्दे७ मे ला ठरला होता विवाह : गुरूवारपर्यंत वाटल्या लग्नपत्रिका पत्रिका