शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी सरसावले कलाकार

By विजय मुंडे  | Updated: April 3, 2023 19:30 IST

नगरपालिकेने १९८३ साली कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह बांधले.

जालना : येथील नगरपालिकेच्या कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. या नाट्यगृहाच्या पुनर्निर्माणासाठी शहरातील कलाकार सरसावले आहेत. नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचा निर्णय रविवारी संस्कार प्रबोधिनी शाळेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नगरपालिकेने १९८३ साली कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह बांधले. ७५० प्रेक्षागृह क्षमतेचे नाट्यगृह ही शहरवासीयांच्या चर्चेचा विषय ठरली होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, सभा यासाठी नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली. मात्र, आज या नाट्यगृहाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. नाट्यगृहातील खुर्च्या तुटल्या आहेत. त्यामुळे आसनव्यवस्थेचा खोळंबा झाला आहे. तसेच इतरही सोयी-सुविधांचा बोजवारा उडाल्याने नाट्यगृहात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याची परिस्थिती नाही. नाट्यगृहाची हीच परिस्थिती बदलून त्याच्या नूतनीकरणासाठी कलाकार सरसावले आहेत.

यावेळी बैठकीस विनोद जैतमहाल, सुरेश केसापुरकर, दिनेश संन्यासी, सतीश लिंगडे, सुमित शर्मा, मुकुंद दुसे, मिलिंद दुसे, सखाराम गुरू, सुनील शर्मा, अविनाश भंडे, ओंकार बिन्नीवाले, सुलभा कुलकर्णी, दीपाली बिन्नीवाले आदींसह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

गांधीगिरीने होणार आंदोलनाची सुरुवातरविवारी झालेल्या बैठकीत सर्वप्रथम नाट्यगृहासमोरील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या पुतळ्याची साफसफाई करून गांधीगिरी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन नाट्यगृहाच्या डागडुजीसाठी अल्टिमेटम देण्यात येणार आहे. लवकरात लवकर नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या कामास सुरुवात न झाल्यास सर्व कलाकार व नाट्यप्रेमींच्या वतीने रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन करतील, असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :Jalanaजालना