शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात बाप्पांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:08 IST

जालना : गणपतीच्या आगमनापूर्वी वरूण राजाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेश उत्सवावरील मरगळ दूर झाली. गणपती बाप्पा मोरयाऽऽच्या निनादात आसमंत दुमदुमून गेला होता. गुलालाची उधळन करत लाडक्या बाप्पांचे स्वागत करून स्थापना करण्यात आली.

ठळक मुद्देयुवकांमध्ये उत्साह : ढोलताशे, पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक

जालना : गणपतीच्या आगमनापूर्वी वरूण राजाने जिल्ह्यात बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेश उत्सवावरील मरगळ दूर झाली. गणपती बाप्पा मोरयाऽऽच्या निनादात आसमंत दुमदुमून गेला होता. गुलालाची उधळन करत लाडक्या बाप्पांचे स्वागत करून स्थापना करण्यात आली. सकाळपासूनच बाजारपेठेत गणपती घेण्यासाठी बच्चे कंपनीसह युवकांनी मोठी गर्दी केली होती. पूजेसाठी लागणारे साहित्य तसेच बाप्पांचा आवडता प्रसाद मोदकांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. विविध प्रकारच्या सजावटींचे साहित्य तसेच खिरपतींचे प्रकार बाजारपेठेत उपलब्ध आहेत.यंदाच्या गणेश उत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. परंतु जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी वरूण राजाचे बºयापैकी पुनरागमन झाल्याने उत्साह वाढला होता. शहरातील मामाचौक, गांधीचमन, सिंधी बाजार, नेहरू रोड, शिवाजी पुतळा, जुन्या जालन्यातील शनिमंदिर, बाजार चौकी परिसरात गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.केळीचे खांब, दूर्वा, कन्हेरी, जास्वंदाची फूले घेताना ग्राहक दिसून आले. एकूणच हलक्याशा शिडकाव्याने देखील गणरायाचे स्वागत केले. चांगला पाऊस बरसेल अशा काळ्या ढगांची आकाशात गर्दी होती. परंतु जोरदार वाºयामुळे ढग पांगल्याने पाऊस बरसला नाही.पूर्वी महालक्ष्मी समोर वेगवेगळ्या पध्दतीची सजावट करण्याची परंपरा होती. परंतु ती आता गणेश उत्सवातही रूढ झाली आहे. यासाठी बाजारपेठेत अनेक आकर्षक दागिने, गणपतीचे महावस्त्र विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही ठिकाणी तर गौरी-गणपतीचे सण लक्षात घेऊन सजाटीच्या सहित्याचे प्रदर्शनच भरविण्यात आले आहेत. या प्रदर्शनातील साहित्य खरेदीसाठी विशेष करून महिला आणि युवतींची गर्दी लक्षणीय आहे.

टॅग्स :JalanaजालनाGanpati Festivalगणेशोत्सव