शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पटरीवर दगडाने भरलेला ड्रम ठेवणाऱ्यास अटक

By दिपक ढोले  | Updated: August 19, 2023 16:47 IST

विद्युतीकरणाचे साहित्य चोरून नेताना पटरीवर सोडला ड्रम

जालना : जालना ते परभणी दरम्यान असलेल्या उस्मानपूर स्थानकाजवळ ५ जुलै रोजी रेल्वे पटरीवर दगडाने भरलेला ड्रम ठेवणाऱ्या संशयितास सातोना येथून रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. बाळू मखमले असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

५ जुलै रोजी एका व्यक्तीने उस्मानपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे पटरीवर दगडाने भरलेला ड्रम ठेवला होता. त्याचवेळी देवगिरी एक्स्प्रेस जात होती. परंतु, लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल परसराम सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून सातोना येथून बाळू मखमले या संशयिताला ताब्यात घेतले.

विद्युतीकरणाचे साहित्य चोरून नेताना पटरीवर सोडला ड्रमसध्या जालना ते परभणी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण सुरू आहे. विद्युतीकरणाचे साहित्य रेल्वे पटरीच्या बाजूला ठेवले होते. सातोना - उस्मानपूर रेल्वे स्थानकादरम्यान पोल क्रमांक २३४-२३५ जवळ संशयित बाळू मखमले याची शेती आहे. बाळू हा रेल्वे विद्युतीकरणाचे साहित्य घेऊन शेतात जात होता. त्यात एका ड्रमचाही समावेश होता. त्याचवेळी देवगिरी एक्स्प्रेस आली. रेल्वेला घाबरून बाळूने ड्रम रेल्वेच्या पटरीवरच सोडला होता, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप कुमार, हवालदार सुनील नलावडे, कॉन्स्टेबल गणेश काळे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना