शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जालना पालिकेच्या २६४ कोटीच्या अंदाजपत्रकास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 01:02 IST

जालना पालिकेच्या आगामी वर्षासाठीच्या अर्थ संकल्पावर सोमवारी जालना पालिकेच्या स्थायी सभेत साधक-बाधक चर्चा करण्यात येऊन त्याला मान्यता देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेच्या आगामी वर्षासाठीच्या अर्थ संकल्पावर सोमवारी जालना पालिकेच्या स्थायी सभेत साधक-बाधक चर्चा करण्यात येऊन त्याला मान्यता देण्यात आली. जवळपास २६४ कोटी रूपयांचे हे अंदाजपत्रक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी हे अंदाजपत्रक स्थायीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर केले.यावेळी स्थायी समितीचे पदसिध्द सदस्य तथा उपनगराध्यक्ष राजेश राऊत, स्थायी समिती सदस्य भास्कर दानवे, रमेश गौरक्षक, गणेश राऊत, अशोक पांगारकर, सोनाली चौधरी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे यांच्यासह अन्य विभागप्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी अंदाज पत्रकातील तरतुदींंवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन हे अंदाजपत्रक आगामी सर्वसाधारण सभेत ठेवून त्याला मंजुरी मिळवण्यात येणार आहे.अर्थसंकल्पासह जालना ते पैठण या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे व्हॉल्व फोडून त्यातून हजारो लिटर पाण्याची चोरी होत आहे.ही चोरी रोखण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करून रात्रीची गस्त घालण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यावरही चर्चा करण्यात आली.यावेळी शहरातील स्वच्छता, मालमत्ता कराची वसुली, वीजुपरवठा आदी मुद्यांवरही चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. लवकरच अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी पुढील महिन्यात विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येऊन त्यात हे अंदाजपत्रक मांडण्यात येणार आहे.

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदBudgetअर्थसंकल्प