शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुस्ती कितीही खेळवा, बाजी मी मारणार- दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:57 IST

कुस्ती स्पर्धा कितीही झाल्या तरी त्यात शेवटचे बक्षीस हे आपणच जिंकणार, असा टोला खा. दानवेंनी लगावल्याने सभागृहात एकच हशा पिकाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहराच्या विकासासाठी आपण गेल्या चार वर्षात कोट्यवधी रूपये आणले आहेत, आणखी निधी हवा असल्यास तो आपण खेचून आणू. कुस्ती स्पर्धा कितीही झाल्या तरी त्यात शेवटचे बक्षीस हे आपणच जिंकणार, असा टोला खा. दानवेंनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता लगावल्याने सभागृहात एकच हशा पिकाला. रामेश्वर साखर कारखान्याचे जेंव्हा नाव घेता तेव्हा रामनगर कारखान्याचे काय त्याबद्दल मात्र ब्र बोलले जात नाही. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले. ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.शहरातील प्रभाग क्रमांक २२, २३ मधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव खा. दानवे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपनराध्यक्ष राजेश राऊत, भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, नगरसेवक विष्णू पाचफुले, प्रशांत गाढे, सिध्दीविनायक मुळे, संजय देठे, नगरसेविका संध्या देठे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, पालकांची यावेळी उपस्थिती होती.आपले शहर कोणत्याच बाबतीत मागे नाही, गुणवत्ता आहे, स्टील उद्योग आणि बियाणांचे हब म्हणून आपल्या शहराची ओळख दिल्लीपर्यंत आहे. मात्र शहरात म्हणावा तसा विकास झालेला नव्हता. शहरात, पाणी नाही, लाईट नाही, रस्ते नीट नाही. शहराच्या विकासासाठी चांगले नागरिक आपले तोंड उघडत नसल्याने शहराचा विकास खुंटत चालला असल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली. गेल्या चार वर्षात राज्य शासनाकडून कोट्यवधी निधी सिमेंट रस्त्यासाठी , पथदिव्यांसाठी आणल्याने शहरात उजेड तरी दिसत आहे. नाही तर आठवर्षापासून शहर अंधारात होते. याकडे सत्ताधाऱ्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा संताप दानवे यांनी व्यक्त केला. मला सेटलमेंटचे राजकारण जमत नाही. सेटेलमेंटच्या राजकारणामुळे शहराचे वाटोळे केले आहे. राज्यातील अनेक शहरांनी कात टाकली आहे.मात्र शहराला जुनी ओळख असतांना आपण मागे का ... यासाठी जिम्मेदार असलेल्यांना जनतेने जाब विचारण्याची गरज असल्याचे यावेळी दानवे म्हणाले. केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर शहराच्या विकासाठी जे - जे करता येईल ते केले, ड्रायपोर्ट, सिडकोचा प्रकल्प, आयसीटी महाविद्यालय लोखंडीपुलासाठी निधी, शहराच सुसज्ज वाचनालय बनविण्यात येणार असल्याचे दानवे म्हणाले. पत्रिकेवर नाव न टाकल्याने काही फरक पडत नाही. पहिलवानाचा गड हा कुस्तीचे मैदान असल्याचा टोलाही दानवे यांनी राज्यमंत्री खोतकर यांचे नाव न घेता लावला. पैशाची कमी नाही. कामे करुन घ्या, असे दानवे म्हणाले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेPoliticsराजकारणEducation Sectorशिक्षण क्षेत्र