शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कोणीही उठतो...खासदार व्हायचे म्हणतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:53 IST

लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे कोणीही उठतो अन खासदार व्हायचे म्हणतो. परंतु त्यांना हे माहिती नाही की, खासदार होण्यासाठी आधी जनतेला विकास कामे कोणती केली हे दाखवावे लागते. तरच जनता विश्वास ठेवते, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे कोणीही उठतो अन खासदार व्हायचे म्हणतो. परंतु त्यांना हे माहिती नाही की, खासदार होण्यासाठी आधी जनतेला विकास कामे कोणती केली हे दाखवावे लागते. तरच जनता विश्वास ठेवते, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत लगावला.जालना शहरासाठी विकास कामे करत असताना अनेक नवनवीन प्रकल्प आणले. शहरातील पथदिवे बंद होते, त्यासाठी पैसे दिले तसेच ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडको प्रकल्प, सीडस्पार्क, विद्यापीठाचे कौशल्य विकास केंद्र, अंतर्गत जलवाहीनी, शहरातील सिमेंट रस्ते आदी कामांसाठी भरीव निधी देऊन जालन्याचा विकास एक हजार ४०० एकरावर नवीन जालना उभे राहणार असल्याचे खा. दानवे यांनी सांगितले.सोमवारी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर सायंकाळी येथील मामा चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करतानाच आगामी लोकसभा निवडणुकीत जनता भाजपलाच साथ देईल असा विश्वास व्यक्त केला. एकूणच या सभेत दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ते म्हणाले की, जालना शहराच्या विकासाठी पूर्वी इच्छा असूनही, विकास कामे करता आली नाहीत, कारण केंद्र आणि राज्यात आमचे सरकार नव्हते. आता परिस्थिती बदलली आहे. दोन्ही ठिकाणी आमचे सरकार आहे. त्यामुळे जालनेकरांनी केवळ सांगावे आणि आम्ही निधी आणावा अशी स्थिती आहे. मी घेऊन गेलेला कुठालाही विकास प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने मंजूर करतात असे सांगून, जालन्यातील निजाम कालीन लोखंडी पुलासाठी १३ कोटी रूपयांचा निधी मंजूर असून, पुढील आठवड्यात त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे खा.दानवे यांनी सांगितले.यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा हा कॉग्रेस, राष्ट्रवादीने झुलवत ठेवला होता . मात्र मराठा समाजाची खरी स्थिती किती हलाखीची आहे, हे ब्राह्मण असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती होती, त्यामुळेच त्यांनी या प्रश्नाला हात घालून १६ टक्के आरक्षण दिल्याचे सांगितले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणेच भ्रष्टवादी काँग्रेस असल्याचे सांगून त्यांचे नामकरण करून भ्रष्टवादी काँग्रेस केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेवर ा भांदरगे, माजी आ. अ‍ॅड. विलास खरात, देविदास देशमुख, शालकीराम म्हस्के, सिध्दिविनायक मुळे, भास्कर दानवे, अशोक पांगारकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य, राहुल लोणीकर, नगरसेवक सतीश जाधव आदी उपस्थित होते.मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वॉटरग्रीड प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची गरज आहे. प्रथमदर्शनी या योजनेला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. यासाठी आणखी तरतूद हवी असून, ती मुख्यमंत्री देतील, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भाषणादरम्यान व्यक्त केला.आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी द्यायची आहे. त्यामुळे तुमचे मत हे आता रावसाहेब दानवे या खासदाराला नसून, तुमचे मत हे भाजपचे प्रदेशाध्यक्षाला असल्याचे सांगितले.यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. निवडणुका तोंडावर आल्या असल्याने आता आळस झटकून विजयासाठीच कामाला लागण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेBJPभाजपाPoliticsराजकारण