जाफराबाद : नगर पंचायत नगरसेवकपदाची फेरआरक्षण सोडत बुधवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी आरक्षण सोडत जाहीर केली असतानाही काही प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या सोडतीवर आक्षेप नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. या प्रकरणात मंत्रालयात सुनावणी झाल्यानंतर १७ प्रभागाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
२०२० ते २०२५ या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंचायत समितीच्या सभागृहात प्रभारी उपविभागीय अधिकारी अंजली कानडे यांच्या अध्यक्षतेखाली १७ प्रभागांची आरक्षण सोडत सोडचिठ्ठी काढून जाहीर करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी अंजली कानडे, मुख्याधिकारी पूजा दुंधाळे आदींची उपस्थिती होती.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार १० नोंहेबर रोजी तहसील कार्यालयात १७ प्रभागातील आरक्षण जाहीर झाले होते. त्यावेळी प्रभाग १ हा इतर मागासप्रवर्गासाठी सुटला होता. आता हा प्रभाग सर्वसाधारणसाठी सुटला आहे. प्रभाग दोन इतर मागासप्रवर्गासाठी सुटला आहे. मागील पाच वर्षांपूर्वीसुद्धा हा प्रभाग याच जागेसाठी होता. प्रभाग सात व आठमध्ये काहीच बदल करण्यात आला नाही.
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्र. ०१ सर्वसाधारण- पुरुष, २ इतर मागास -पुरुष, ३ सर्वसाधारण -पुरुष, ४ इतर मागास-महिला, ५ इतर मागास -महिला, ६ सर्वसाधारण -पुरुष, ७ अनुसूचित जाती -महिला, ८ अनुसूचित जाती-पुरुष, ९ सर्वसाधारण- महिला, १० सर्वसाधारण-महिला, ११ सर्वसाधारण-पुरुष, १२ इतर मागास-महिला-पुरुष, १३ सर्वसाधारण-महिला, १४ इतर मागास -पुरुष, १५ सर्वसाधारण-महिला, १६ सर्वसाधारण-महिला, १७ सर्वसाधारण पुरुषासाठी आरक्षित झाला आहे.