शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अन् जालना झाला ‘रेशीम’ जिल्हा, राज्यातील एकमेव जिल्हा : ९८७ एकरांवर तुतीची लागवड

By विजय मुंडे  | Updated: September 7, 2024 12:17 IST

Jalana News: जालना जिल्ह्यातील ९६९ शेतकरी ९८७ एकरांवर तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑटोमॅटिक रिलिंग मशीनची उभारणी केल्यामुळे रेशीम धागा निर्मिती होत आहे. त्यामुळे आता रेशीम अंडीपुंज, कोष उत्पादन ते रेशीम धागा निर्मिती करणारा जालना जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे. 

- विजय मुंडेजालना - जिल्ह्यातील ९६९ शेतकरी ९८७ एकरांवर तुतीची लागवड करून रेशीम कोष उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑटोमॅटिक रिलिंग मशीनची उभारणी केल्यामुळे रेशीम धागा निर्मिती होत आहे. त्यामुळे आता रेशीम अंडीपुंज, कोष उत्पादन ते रेशीम धागा निर्मिती करणारा जालना जिल्हा राज्यात एकमेव ठरला आहे. रेशीम शेतीसाठी शासनाकडून प्रति एकर तीन लाख ९७ हजार ३३५ रुपये अनुदानासह अंडीपुंजही दिले जातात. २०२३-२४ मध्ये रेशीम कोषाला प्रति क्विंटल ४३ हजार रुपयांचा भाव मिळाला. एक एकरात तुतीची लागवड करून ३५० अंडीपुंजाची दोन पिके घेता येतात. पहिल्या वर्षी एक लाख १२ हजारांचे उत्पन्न मिळते. दुसऱ्या वर्षी ८०० अंडीपुंजाचे संगोपन करून ४५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे दोन लाख ५२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. 

आता रेशीम कापडही निर्मिती केली जाईलरेशीम धागा निर्मितीच्या पुढील प्रक्रिया उद्योग ज्यात रेशीम धाग्यास पीळ देणे, रेशीम धाग्यांची रंगणी करणे,  रंगणी केलेल्या रेशीम धाग्यापासून रेशीम कपडानिर्मिती करणे आदीसाठी जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत.

रेशीम कोष बाजारपेठरेशीम कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना कर्नाटकात जावे लागत होते. परंतु, २०१८पासून जालन्यात रेशीम कोष बाजारपेठ सुरू झाली. शेतकऱ्यांना जालन्यातील बाजारपेठेतच कर्नाटकचा दर मिळत आहे.

टॅग्स :JalanaजालनाAgriculture Sectorशेती क्षेत्र