शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धेचा गळा चिरून मृतदेह शेतात फेकला, पिशवीतील चिट्ठीवरून पटली ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 19:06 IST

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, गळ्याला दोरी बांधलेली होती. धारदारशस्त्राने महिलेचा गळा व मानेवर वार करण्यात आले होते. 

जालना : एका ६५ वर्षीय महिलेचा गळा आवळून व धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बदनापूर तालुक्यातील साखरवाडी येथे गुरूवारी रात्री उघडकीस आली. सुमनबाई माणिक जिगे (६५ रा. पानशेंद्रा, ता.जि. जालना) असे मयत महिलेचे नाव आहे. 

या प्रकरणी शुक्रवारी सकाळी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास  बदनापूर तालुक्यातील कंडारी ते चिखली रोडवरील साखरवाडी जवळील एका  शेतातील लिंबाच्या झाडाखाली  महिलेचा मृतदेह ग्रामस्थांना दिसून आला. ग्रामस्थांनी याची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता, गळ्याला दोरी बांधलेली होती. धारदारशस्त्राने महिलेचा गळा व मानेवर वार करण्यात आले होते. 

शिवाय, महिलेच्या कंबरेला असलेल्या पिशवीतील  कागदावर एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिसून आला.त्यानंतर महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी बदनापूर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविला. या प्रकरणी मयत महिलेचा पुतण्या चंद्रकांत जिगे यांच्या  फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला पोनि. शिवाजी बंटेवाड यांनी भेट दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना