शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
4
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
5
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
6
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
7
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
8
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
9
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
10
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
11
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
12
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
13
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
14
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
15
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
16
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
17
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
18
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
19
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
20
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला

अंबड शहराला पाणी देणार नाही -संगीता गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:03 IST

दररोज सहा एमएलडी पाणी अंबड पालिकेला मिळवण्याचा आ. नारायण कुचे यांचा प्रयत्न आहे. जालनेकरांवर हा अन्याय असून, याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : युडीआयच्या विशेष योजनेतून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि जालना पालिकेच्या आर्थिक सहभागातून जायकवाडी -जालना ही नवीन जलवाहिनी योजना राबविण्यात आली. मात्र, सत्तेचा गैरवापर करुन या योजनेवर हक्क सांगत तब्बल दहा टक्के म्हणजेच दररोज सहा एमएलडी पाणी अंबड पालिकेला मिळवण्याचा आ. नारायण कुचे यांचा प्रयत्न आहे. जालनेकरांवर हा अन्याय असून, याविरोधात आपण मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या की, जालना शहर व परिसरात ड्रायपोर्ट, आयसीटी, सिडको वसाहत या व अन्य प्रस्तावित विकास प्रकल्पांमुळे पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. सध्या शहराची ८० एमएलडी पाण्याची गरज असताना ६० एमएलडी पाण्यावर भागवावे लागत आहे. त्यातच अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर व विविध ठिकाणचे जलकुंभ उभारणीनंतर नियोजनबद्ध वितरणासाठी पाण्याची गरज वाढणार आहे. मलनिस्सारण प्रकल्पही लवकरच सुरु होणार आहे. यामुळे आगामी काळात जालना शहर व परिसराचीच पाण्याची गरज अधिक राहील. त्यातच अंबड पालिकेच्यावतीने आ. नारायण कुचे यांनी या योजनेवर अंबड पालिकेचा हिस्सा दाखवत दररोज तब्बल सहा एमएलडी पाण्याची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. सध्या अंबड पालिकेला अडीच एमएलडी पाणी दिले जात आहे.जालन्याच्या हिश्श्याचे पाणी अंबड पालिकेने पळवले तर शहरावर पुन्हा एक महिना अंतराने पाणी पुरवठा करण्याची वेळ येण्याची भिती माजी आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केली. २०१२ मध्ये जशी स्थिती होती तीच पुन्हा निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. जालनेकरांच्या हितासाठी लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी सहकार्य करुन शहराच्या हिश्श्याचे इतरांना घेऊ देऊ नये, अशी अपेक्षाही माजी आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केली.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईgovernment schemeसरकारी योजना