शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अंबड तालुक्यात बिबट्याचा थरार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 15:34 IST

मागील दहा दिवसापासून तालुक्यात सुरू असलेला बिबटयाचा थरार शुक्रवारी सुध्दा कायम राहिला.

ठळक मुद्दे शुक्रवारी पहाटे बिबट्याने पिठोरी सिरसगाव जवळील शोभानगर येथे एका वासराची शिकार केली. शेतकऱ्यांना दररोज आपले पशुधन गमवावे लागत असल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.     

अंबड (जालना ) : मागील दहा दिवसापासून तालुक्यात सुरू असलेला बिबटयाचा थरार शुक्रवारी सुध्दा कायम राहिला. शुक्रवारी पहाटे बिबट्याने पिठोरी सिरसगाव जवळील शोभानगर येथे एका वासराची शिकार केली. वनविभागाच्या नियोजनशून्य व गलथान कारभारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दररोज आपले पशुधन गमवावे लागत असल्याने शेतकऱ्यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.     

शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शोभानगर येथील शेतकरी सखाराम काकडे नेहमीप्रमाणे शेतात दूध घेण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना गोठ्याच्या बाजुला कालवड मृृत अवस्थेत आढळुन आली. बिबट्यानेच कालवडीची शिकार केल्याचे लक्षात येताच परीसरातील शेतकरी आले व त्यांनी याविषयी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. 

वनविभागाचे वनरक्षक ए. डी. तागड, जी. एस. चाटे यांनी काकडे यांच्या शेताची व गोठयाची पाहणी करून पंचनामा केला.विशेष म्हणजे मागील चार दिवसापासून सखाराम काकडे यांच्या शेताच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. गजानन काकडे, शिवाजी काकडे, सखाराम काकडे, गणेश काकडे, गणेश मारेकर, मंदा काकडे यांनी प्रत्यक्ष बिबट्या पाहिल्याचे सांगितले. याविषयी काकडे कुटुंबियांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती सुद्धा दिली होती. परंतु, वनविभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी शेताकडे पाहणीसाठी फिरकले नाही.

वडीगोद्री, धाकलगांव, शोभानगर, डावरगांव व अंबड शिवारात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याने आतापर्यंत तीन गायींचे वासरु, एक पाळीव कुत्रा यांची शिकार केली आहे तर दोन वासरांवर हल्ला करुन त्यांना जखमी केले आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्यापपर्यंत तरी यश आलेले नाही. काही युवकांकडून शेतात रात्रभर पहारा देण्यात येत आहे. तर परिसरातील पशुपालक धास्तावले आहेत. 

दहा दिवसानंतर वनविभागाला जागशुक्रवारी बिबट्याला पकडण्यासाठी शोभानगर येथे पिंजरा लावण्यात आल्याची माहीती वनरक्षक ए. डी. तागड यांनी दिली. 

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगलJalanaजालनाforest departmentवनविभाग