शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

"आधीच ६० टक्क्यांना कुणबी आरक्षण, एकदमच ५ कोटी मराठा ओबीसीत येतील हा गैरसमज"

By विजय मुंडे  | Updated: October 31, 2023 12:10 IST

आपण महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही.

जालना : अगोदरच ६० टक्के मराठा समाज ओबीसीत आहे. त्यामुळे ५ कोटी मराठा समाज ओबीसीत येणार हा गैरसमज दूर करा. आपण महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही. अर्धवट आरक्षणाचा जीआर स्वीकारणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी, ओबीसीत येण्यासाठी आणखी जास्तीचा मार्ग काय यावर आपण अभ्यासकांसमवेत आज बैठक घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाचा मंगळवारी सातवा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्याशी मंगळवारी सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जरांगे म्हणाले, ओबीसीच्या यादीत ८३ व्या क्रमांकावर मराठा कुणबी आहे. व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आहेत. त्यानुसार आरक्षण दिले आहे. त्यामुळे २००४ च्या जीआरमध्ये दुरूस्ती करावी. समितीकडे अनेक पुरावे आहेत. शासनाला महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण देता येणार आहे. त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले आहे. अगोदरच ६० टक्के मराठा ओबीसी आरक्षणात गेला आहे. थोडे राहिले आहेत. गैरसमज दूर करा. उर्वरित थोडा समाज बाकी आहे. त्यामुळे विशेष अधिवेशन घेवून मराठा समाजाला आरक्षण द्या, त्याला चॅलेंज होणार नाही. ज्यांना घ्यायचे ते घेतील ज्यांना घ्यायचे नाही ते घेणार नाहीत. परंतु, अर्धवट घेणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण