शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

३६ हजार कामगारांना १२ कोटी रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:35 IST

बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना आठ वर्षात साहित्य खरेदीसाठी १२ कोटी ६२ लाख ५२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले

गजानन वानखडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना आठ वर्षात साहित्य खरेदीसाठी १२ कोटी ६२ लाख ५२ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होत आहे.बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी २८ विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामध्ये इमारत बांधकाम कामगार, दगडकाम, रंगकाम, सुतारकाम, लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्याचे काम, सुरक्षा उपकरण, जलसिंचन, काचेच्या संदर्भात काम, अग्निशमन यंत्रणा, इलेक्ट्रिशियन तसेच विद्युत काम, विटांचे तसेच कौलारु काम, सौरउर्जेशी निगडीत, वातानुकूलित यंत्र दुरुस्ती, कामगारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती यासह २८ प्रकारचे काम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. १८ ते ६० या वयोगटातील कामगारांनी २०११ ते २०१९ पर्यंत येथील कामगार मंडळात ६० हजारांपेक्षा जास्त कामगारांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३६ हजार कामगार जीवित आहेत. कामगारांना विविध कामे करताना लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नोंदणीकृत कामगारांना कामगार मंडळाच्या वतीने २०१४ पर्यंत ३ हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्यात येत होते. वाढत्या महागाईमुळे शासनाने २०१८ पासून २ हजार रुपयांची वाढ करुन अनुदान ५ हजार रुपये प्रति कामगार केले. याचा फायदा कामगारांना व्हावा यासाठी जिल्ह्यात अनेक वेळा नोंदणी अभियान राबविण्यात आले आहे. तसेच दररोज येथील कार्यालयात ७०० कामगारांची नोंदणी होत असल्याची माहिती आहे. मात्र येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने अर्जाची छाननी, अनुदान वेळेत मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत.येथील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात कामगार अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकरी, वेतन अधिकारी, सुविधाकार, कनिष्ठ लेखापाल, डेटा एट्री आॅपरेटर, लिपिक- टंकलेखक, शिपाई अशी १८ पदे मंजूर आहेत.यापैकी एक कामगार अधिकारी दोन शिपाई आदी पदे भरण्यात आली असून उर्वरित पदे रिक्त आहेत. अनेक कामे कंत्राटी कर्मचाºयांव्दारे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दररोज ७०० कामगारांची नोंदणी होेते. कर्मचाºयांच्या रिक्त पदांमुळे विविध कामांना विलंब होत असल्याची ओरड होत आहे.

टॅग्स :Labourकामगारfundsनिधीgovernment schemeसरकारी योजना