शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

चार ठाण्यांतील आरोपी एकाच पोलीस कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 00:50 IST

शहरातील चारपैकी केवळ सदरबाजार पोलीस ठाण्यात आरोपी ठेवण्यासाठी कोठडी आहे

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील चारपैकी केवळ सदरबाजार पोलीस ठाण्यात आरोपी ठेवण्यासाठी कोठडी आहे. त्यामुळे इतर पोलीस ठाण्यातील आरोपी सदरबाजार पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले जातात. परिणामी, कोठडीतील आरोपी संभाळणे, वैद्यकीय उपचार, तपास इ. कामांसाठी मात्र, संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते.उद्योग नगरी म्हणून ओळखल्या जाणा-या जालना शहरातील कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सदरबाजार पोलीस ठाणे, कदीम पोलीस ठाणे कार्यरत होते. मात्र, शहराचा वाढलेला विस्तार पाहता स्वतंत्र चंदनझिरा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. त्यात तालुका जालना पोलीस ठाणेही शहरातच असून, शहर परिसरातील अनेक घटना, घडामोडीचे गुन्हे या ठाण्यात दाखल होतात. कदीम पोलीस ठाण्याची इमारत जुनी झाली असून, मागील काही महिन्यांपूर्वी येथील पीओपीचे प्लास्टरही कोसळले होते. त्यामुळे सध्या या ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी सदरबाजार पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले जातात.चंदनझिरा पोलीस ठाण्याचे कामकाज भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू आहे. त्यामुळे येथे पोलीस कोठडीची सोय नाही. तर तालुका जालना पोलीस ठाण्याला शासकीय इमारत आहे. मात्र, या इमारतीतही आरोपींसाठी असलेल्या पोलीस कोठडीची सोय नाही. तिन्ही ठिकाणी पोलीस कोठडी नसल्याने सदरबाजार पोलीस ठाण्यातील पोलीस कस्टडीत चारही ठाण्याचे आरोपी ठेवले जातात.सदर बाजार पोलीस ठाण्याच्या कस्टडीत साधारणत: १५ आरोपी बसू शकतात. मात्र, १५ आरोपी एकाच कस्टडीत ठेवल्यानंतर आरोपींचीही गैरसोय होण्याची शक्यता अधिक असते.आरोपी ठेवल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी गार्ड ड्युटीवर लावण्यात येतात. त्यांची वैद्यकीय अधिकारी, तपास, न्यायालयात हजर करणे इ. बाबींसाठी मात्र, संबंधित तपासाधिकाºयासह कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागते. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र, चारही ठाण्यांचे आरोपी एकाच कस्टडीत संभाळताना संबंधितांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते.एकाच वेळी अनेक आरोपी आले तर पोलीस कस्टडीला चक्क कोंडवाड्याचे स्वरूप येण्याची शक्यता असते.त्यामुळे आरोपी ठेवण्यासाठी सेंट्रल पोलीस कस्टडी किंवा इतर पोलीस ठाण्यातील कस्टडीचा वापर करण्याची गरज आहे.महिला आरोपींना ठेवायचे कुठे ?सदर बाजार पोलीस ठाण्यात पुरूष आरोपींना ठेवण्यासाठी कस्टडी आहे. मात्र, महिला आरोपींना ठेवण्यासाठी असलेल्या कस्टडीची दुरवस्था झाली आहे.महिला आरोपी ताब्यात घेतल्या तर त्यांना ठेवायचे कोठे, असा प्रश्न अधिका-यांसमोर निर्माण होतो. त्यामुळे महिला आरोपींसाठीही कस्टडी तयार करण्याची गरज आहे.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसJalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाCourtन्यायालय