शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत जालन्यातील एटीएममध्ये खडखडाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:14 IST

ऐन दिवाळीत एटीएममध्ये खडखडाट आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ऐन दिवाळीतएटीएममध्ये खडखडाट आहे. यामुळे ग्राहकांत नाराजी आहे. बहुतांश एटीएमबाहेर ‘नो कॅश’चा फलक लावण्यात आला आहे. यामुळे गैरसोय होत आहे. दिवाळी असल्याने बँकांनी नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, त्यांच्या दुर्लक्षाचा फटका दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना बसला आहे.दिवाळी सणात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यासाठी बहुतांश लोक एटीएममधून पैसे काढतात. दिवाळीमुळे शनिवारपासूनच बहूतांश एटीएममध्ये चलन तुटवडा दिसून आला. पुढील तीन दिवस बँकांना सुटी असल्याने पुन्हा अडचण येणार आहे. यासाठी बँकांनी एटीएममध्ये कॅश भरणे गरजेचे आहे.शुक्रवारी दिवाळी असल्याने खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली. त्या व्यवहारांचा भार एटीएम केंद्रांवर पडला. मुख्य बाजारपेठांच्या परिसरातील एटीएम केंद्रांमध्ये शनिवारी व रविवारी पैसेच शिल्लक नसल्याचे चित्र होते. मोक्याच्या ठिकाणच्या एटीएम केंद्रांवर चलन तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांनी आपला मोर्चा गल्लोगल्ली असणाºया एटीएम केंद्रांकडे वळविला. त्यामुळे त्या केंद्रांवरही पैशांचा खडखडाट निर्माण झाल्याने अनेक नागरिकांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागले.एटीएम केंद्रांमध्ये रक्कम जमा करण्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या नजीक असणाºया बॅकांच्या शाखेची असते. तसेच बाहेरील कंपन्यांकडून देखील (आऊटसोर्स) हे काम केले जाते. लागोपाठ येणाºया सुट्यांच्या वेळी एटीएम केंद्रे झटकन रिकामी होतात. अशावेळी खबरदारी म्हणून आगाऊ स्वरुपात एटीएम केंद्रांवर रोख भरणा करुन ठेवला जातो. प्रत्येक एटीएममध्ये पैसे टाकण्याची मर्यादा निश्चित असल्याने त्यांनाही तेवढेच पैसे त्यामध्ये भरता येतात.बँकांनी लक्ष देण्याची मागणीदिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांवर पैसे काढण्यासाठी सुरू असलेल्या एटीएम केंद्रांचा शोध घेण्याची वेळ आली. त्यामुळे सुरू असलेल्या एटीएम केंद्रांवर नागरिकांच्या मोठ्या रांगा होत्या. ऐन सणासुदीच्या काळात सर्व बँकांनी एटीएम मशीन सुरू राहतील, याची काळजी घेण्याची गरज आहे.बाजारपेठ परिसरातील एटीएम बंदगांधी चमन, शिवाजी पुतळा, कचेरी रोड, शनि मंदिर, बडी सडक, सिंधी बाजार यांसह विविध ठिकाणच्या बाजारपेठांतील एटीएममध्ये पैसे नसल्याचा फलक लावण्यात आला होता.

टॅग्स :atmएटीएमBanking Sectorबँकिंग क्षेत्रDiwaliदिवाळीMarketबाजार