शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२१ फेब्रुवारीनंतर समाज आंदोलनाची दिशा बदलणार; मनोज जरांगेंची सरकारला नवी डेडलाईन

By विजय मुंडे  | Updated: February 16, 2024 15:08 IST

सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय थांबणार नाही

जालना : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी गैरसमज दूर करावा. सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करून अंमलबजावणी केल्याशिवाय आपण थांबणार नाही. २० तारखेपर्यंत हा निर्णय झाला नाही तर २१ फेब्रुवारीनंतर समाज आंदोलनाची दिशा बदलणार असून, ते आंदोलन तुमच्या हाताबाहेर गेलेले असेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

जरांगे पाटील यांनी शुक्रवारी दुपारी माध्यमांशी संवाद साधला. ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ज्यांची नोंद सापडली नाही त्यांच्यासाठी सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून त्यानुसार नोंदी नसलेल्यांना आरक्षण देणार आहेत. नोंदी नसणाऱ्यांना मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण ते मान्य नाही. ते आरक्षण ज्यांना हवे आहे त्यांनी घ्यावे. परंतु, ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार हा विश्वास आहे, असेही जरांगे म्हणाले.

२० तारखेपर्यंत मान्य करा, अन्यथासमाजासमोर पर्याय राहणे आवश्यक आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार मिळणारे आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर मिळणारे आरक्षण राहणार आहे. त्यामुळे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, अंतरवालीसह राज्यातील गुन्हे मागे घ्यावेत, हैदराबादचे गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट, बॉम्बे गॅझेट स्वीकारून इतर मागण्या २० तारखेपर्यंत मान्य करा. अन्यथा तिथून पुढे सरकारने सरकारचे धोरण पहावे, मराठे मराठ्यांचे धोरण पाहणार आहेत, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना