शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

चौफेर अभ्यासानंतरच नाणार प्रकल्प मराठवाड्यात आणावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:25 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प हा गुजरातला नेण्याऐवजी तो मराठवाड्यात आणावा अशी भूमिका घेऊन एक मे रोजी मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास मंचाच्यावतीने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प हा गुजरातला नेण्याऐवजी तो मराठवाड्यात आणावा अशी भूमिका घेऊन एक मे रोजी मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास मंचाच्यावतीने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. हा प्रकल्प मराठवाड्यात आणताना त्याचा चौफेर अभ्यास करूनच तो आणण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी राजकीय मतभेद दूर ठेवून सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मान्यवरांनी आपल्या विचारातून सांगितले.येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभाृहात नाणार प्रकल्पा बाबत मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी केले होते. याचे उद्घाटन मराठवाडा जनता परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल या होत्या. यावेळी कामगार नेते उध्ध्दव भवलकर, माजी मंत्री डॉ. शंकरराव राख, माजी आ. कल्याण काळे, माजी आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विमल आगलावे, गणेशलाल चौधरी, अ‍ॅड. विनायक चिटणीस, साईनाथ चिन्नादोरे, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण, अंकुशराव देशमुख आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी उध्दव भवलकर यांनी सांगितले की, मराठवाड्यावर कायम अन्याय झाला आहे. मात्र त्यासाठी आपल्यामध्ये देखील एकी हवी, कुठल्याही मुद्यावर एकत्रित येऊन प्रथम त्याचा सर्व बाजूंनी अभ्यास करून एक अजेंडा ठरवून त्याचा पाठपुरावा करण्यााची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी हा प्रकल्प गुजरातला नेण्याच्या हालचाली म्हणजे महाराष्ट्रावर अन्यायच आहे. तसेच होऊ नये यासाठी संघर्ष करावा लागेल. तसेच हा प्रकल्प मराठवाड्यात आणताना त्याचा वैज्ञानिक तसेच पर्यावरणीय संदर्भाने अभ्यास करूनच निर्णय होणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.विनित साहनी, साईनाथ चिन्नादोरे, प्रा. बाबा उगले, माजी आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आदींनी विचार मांडले. प्रास्ताविक संयोजक संजय लाखे पाटील यांनी केले.त्यांनी यावेळी नााणर प्रकल्प हा मराठवाड्यासाठी कशी संजीवनी ठरू शकते याची अनेक उदाहरणे देऊन केले. हा प्रकल्प मराठवाड्यात आल्यास त्यातून तीन लाख कोटी रूपयांची गुंतवणूक होऊ शकते असेही लाखे पाटील यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र राख, राजेंद्र गोरे, संजीव देशमुख, माऊली कदम, अ‍ॅड. शैलेश देशमुख यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पnagaradhyakshaनगराध्यक्ष