शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या काही महिन्यांनंतर पतीचा खरा चेहरा दिसला; जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

By दिपक ढोले  | Updated: August 10, 2022 18:31 IST

जालना : पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील कारला येथे मंगळवारी घडली. अंजना ग्यानदेव ...

जालना : पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील कारला येथे मंगळवारी घडली. अंजना ग्यानदेव भोकरे (२५ रा. कारला, ता. जि. जालना) असे मयत महिलेचे नाव आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी उगळे येथील अंजना उगळे यांचा विवाह कारला येथील ग्यानदेव भोकरे यांच्यासोबत झाला होता. काही दिवस त्यांचा संसार सुखाने चालला. परंतु, त्यानंतर पती ग्यानदेव भोकरे हा अंजना भोकरे यांना मानसिक व शारीरिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून अंजना भोकरे यांनी कारला येथील परमेश्वर सरोदे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन मंगळवारी आत्महत्या केली. येथील नागरिकांनी याची माहिती मौजपुरी पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला. या प्रकरणी मयताचा भाऊ भगवान उगळे यांच्या फिर्यादीवरून संशयित ग्यानदेव सखाराम भोकरे याच्याविरुध्द मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि. नेटके हे करीत आहेत.

२२ वर्षीय तरूणीची आत्महत्याएका २२ वर्षीय तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात घडली. पायल रमेश सोसे (२२ रा. मंठा चौफुली) असे मयत मुलीचे नाव आहे. आत्महत्या केल्याचे कळताच, नातेवाईकांनी पायलला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेको. बोडखे हे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूJalanaजालना