शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद ! कोरोनावर मात करून ६४ योद्धे पुन्हा मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:49 IST

कर्मचाऱ्यांनी पुन्हा पुन्हा कर्तव्यावर रुजू होऊन कोरोना लढ्यात सहभागी होऊन जनसेवा सुरू केली आहे.

ठळक मुद्देबाधित झालेल्या तिघांचा दुर्दैवी मृत्यूसध्या १७ बाधित कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहत

- विजय मुंडे

जालना : कोरोना संसर्गात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या आरोग्य, पोलीस दलातील ८४ जणांना आजवर कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ६४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनावर मात केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुन्हा पुन्हा कर्तव्यावर रुजू होऊन कोरोना लढ्यात सहभागी होऊन जनसेवा सुरू केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि आरोग्य, पोलीस, महसूल, नगर पालिकांसह इतर प्रशासकीय विभागावरील कामाचा ताण वाढला. जिल्ह्यात आजवर ३८५० कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यातील १११ जणांचा मृत्यू झाला असून, यशस्वी उपचारानंतर २४६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील ३८५० कोरोना बाधितांमध्ये फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील ६० वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर जिल्हा पोलीस दलातील २४ अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. सहकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या मानसिकतेवरही परिणाम झाला होता. मात्र, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळोवेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून चर्चा करीत मानसिकता बळकट करण्याचे काम केले. त्यामुळे रूग्णसंख्या वाढत असतानाही फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जनसेवेचा उत्साह आजही कायम आहे.

आरोग्य विभागातील ६० जणांना कोरोनाची बाधा : यात शासकीय १३ व खाजगी १० अशा २३ डॉक्टरांचा समावेश आहे. त्यातील १३ शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील सात जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सहा जणांवर उपचार सुरू आहेत. खाजगी १० वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी ८ जणांनी कोरोनावर मात केली असून, एकावर उपचार सुरू आहेत. तर एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्टाफ नर्समध्ये १२ शासकीय स्टाफ नर्स कोरोना बाधित झाल्या होत्या. पैकी ८ जणींनी कोरोनावर मात केली असून, चौघींवर उपचार सुरू आहेत. तर खाजगी रूग्णालयातील १० जणींना कोरोना झाला होता. त्यातील ९ जणी कोरोनामुक्त झाल्या असून, एका परिचारिकेचा मृत्यू झाला आहे. तर इतर कर्मचाऱ्यांमध्ये शासकीय मधील ७ व खाजगी रूग्णालयातील ८ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. शासकीय, खाजगीमधील १५ बाधितांपैकी १३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोघांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा पोलीस दलातील २४ जणांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १९ जणांनी कोरोनावर मात केली असून, चौघांवर उपचार सुरू आहेत.

इतर विभागातही बाधित रूग्णकोरोनाच्या लढ्यात काम करणाऱ्या आरोग्य, पोलीस दलासह इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील अनेकांनी कोरोनावर मात करून पुन्हा कर्तव्यावर रुजू होत जनसेवा सुरू केल्याचे सांगण्यात आले.

काऊन्सलिंगवर भरकोरोनाच्या लढ्यात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काऊन्सलिंग करण्यावर भर दिला आहे.  बाधितांवर यशस्वी उपचार केल्याने ते कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाच्या लढ्यात आरोग्य विभागासह इतर प्रशासकीय विभागांचे एकत्रित काम सुरू आहे.- डॉ. अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना

कर्तव्य आणि दक्षतेची सांगडकोरोनाच्या लढ्यात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करून मार्गदर्शन केले. दक्षतेसाठी आरोग्य तपासणी, औषधांचे वाटप, सुरक्षेची साधणे दिली. कोरोनाच्या लढ्यात स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन सर्वजण कर्तव्य बजावत आहेत.- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना