शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

प्रशासनाचे नाचता येईना अंगण वाकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2018 1:00 AM

एकीकडे निधी नाही म्हणून नेहमी ओरड होते परंतु, जालना जिल्ह्यात सध्या वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा नियोजन विकास आराखडा जवळपास १९० कोटी रूपयांचा होता. त्यापैकी अद्यापपर्यंत ४५ टक्के खर्च विविध विकास योजनांवर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एकीकडे निधी नाही म्हणून नेहमी ओरड होते परंतु, जालना जिल्ह्यात सध्या वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा नियोजन विकास आराखडा जवळपास १९० कोटी रूपयांचा होता. त्यापैकी अद्यापपर्यंत ४५ टक्के खर्च विविध विकास योजनांवर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.ही माहिती दोन दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा नियोजन विकास आढावा बैठकी पुढे आल्याने पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजीमंत्री अर्जुन खोतकर, आ. संतोष दानवे, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे हे अवाक झाले आहेत.एकूणच जिल्ह्यातील प्रशासनात अशी मरगळ आली आहे हे बैठकीतून पुढे आले आहे. अनेक विभागांनी दिलेला निधी यांनी खर्च केलेला नाही. याची कारणे विचारली असता थातूरमातूर उत्तरे देवून वेळ मारून नेली, परंतू, बैठकीत पालकमंत्री लोणीकर, राज्यमंत्री खोतकर आणि आ. राजेश टोपे यांनी कडक भूमिका घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. क्रीडा, बांधकाम आणि अन्य महत्वाच्या विकास योजनांवरील नगन्य निधी खर्च झाला आहे. जिल्हा परिषदेचेही तीच गत आहे. जिल्हा परिषद आणि नियोजन विभाग यांच्या समन्वयाच्या अभावामुळे अनेक विभागांचा निधी कागदोपत्री पडून आहे. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वच नेते आता सरसावल्याचे चित्र आहे. सध्या भाजपची सत्ता असल्याने निधीची गंगाच जणूकाही जालना जिल्ह्यात अवतरल्याचे चित्र आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतू, या आलेल्या निधीतून कशी कामे उरकली जात आहेत. ते जालना शहरातील सिमेंट रस्त्यांच्या दर्जावरून दिसून येते. सिमेंट रस्ता हे उदाहरण आहे जेथे आवश्यकता नाही तेथेही केवळ कार्यकर्ते सांभाळण्यासाठी विशेष बाब म्हणून निधी खर्चाला मंजूरी दिली जात आहे. तीन सत्ता केंद्र असल्याने प्रशासनही गोंधळात पडले आहे. दर वेळेला केलेल्या प्रस्तावामुळे बदल करावे लागत असल्यामुळे ऐकावे तरी कोणाचे ? असा प्रश्न अधिकाºयांसमोर निर्माण होत असल्याचे अधिकारी खाजगीत बोलून दाखवतात.जिल्ह्यातील बहुतांश विभाग प्रमुख आणि कर्मचारी औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यातून अप-डाऊन करत असल्याने जिल्ह्यातील कार्यालये हे रेल्वेच्या वेळापत्रकानूसार चालतात हे नविन राहिलेले नाही. याची पुष्टी करतांना अधिकारी-कर्मचारी हे मुंबईचे उदाहरणे देवून आपणच कसे खरे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात. जिल्ह्यात सात मध्यम सिंचन प्रकल्पांना मंजूरी मिळाली आहे. परंतू, यामध्ये त्या प्रकल्पाचा प्रत्यक्ष खर्च कमी आणि पुर्नवसन तसेच भु- संपादनासाठीच मोठा खर्च येणार असल्याने हा निधी देखील अद्याप मिळालेला नाही. एकूणच पीकविमा भरतांना तो शेतकºयांनी अनेक वेगवेगळ्या बँकांमधून भरल्याने शेतक-यांची संख्या फुगली असल्याचे सांगण्यात येते. या बाबतही अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. आता प्रशासनाची दोरी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य तसेच जि. प. सीईओ नीमा आरोरा यांच्या हातात आहे. हे तिघेही तरूण असून थेट आयएएस आणि आयपीएस असल्याने त्यांच्याकडून जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी अखर्चिक रकमेविषयी अधिका-यांना कडक करण्याची गरज आहे. नसता पुन्हा जिल्हा हा निधी मिळूनही विकासापासून दूर राहू शकतो.याकडे लक्ष देण्याची गरज आहे...

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरArjun Khotkarअर्जुन खोतकर