शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा करून गेले अन् अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 14:05 IST

मी सध्या शिवसेनेत आहे, असे खोतकर यांनी स्पष्ट केले. पण भविष्यात राहणार का? यावर उत्तर देणे खोतकरांनी टाळले आहे.

जालना:  माजीमंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसांचा औरंगाबाद दौरा करून गेले अन् जालन्यात शिवसेनेला मोठा झटका बसल्याची चर्चा आहे. माजीमंत्री अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील काही दिवसांमध्ये खोतकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची दुसऱ्यांदा भेट झाली आहे. विशेष म्हणजे, दिल्लीत झालेल्या भेटीत खोतकरांचे कट्टर राजकीय विरोधक केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची उपस्थिती होती. या भेटीचा एक फोटो व्हायरल झाल्याने खोतकर यांच्या शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

जालन्यात शिवसेनेचा चेहरा असलेले माजीमंत्री अर्जुन खोतकर शिंदे गटात गेले तर उद्धव ठाकरे यांना हा मोठा झटका असेल असे बोलण्यात येत आहे. खोतकर मागील काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर आहेत. त्यांचा साखर कारखाना, घर आणि इतर ठिकाणी ईडीने सातत्याने कारवाई केली होती. तसेच याकाळात सेनेत ते एकटे पडल्याची दिसून येत होते. यामुळे खोतकर अस्वस्थ असल्याची चर्चा देखील होती. त्यानंतर राज्यात शिवसेनेत पडलेली फुट आणि झालेले सत्तांतर यामुळे खोतकर पुन्हा चर्चेत आले आहेत. दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर, भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मागील काही दिवसांतील शिंदे - खोतकर यांची ही दुसरी भेट होती. तसेच खोतकर आणि मुखमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी खा. हेमंत पाटील यांनी मध्यस्थी केल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्जुन खोतकर यांच्यात चर्चा सुरु असून लवकरच याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले एकत्र काम करा, दानवेंची माहिती दरम्यान, जालना जिल्ह्यात खोतकर यांचे कट्टर राजकीय विरोधक केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीत उपस्थित होते. खोतकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशावर थेट बोलणे टाळून दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी, आतापर्यंत जे काही झाले ते विसरा आणि यापुढे सोबत काम करा, असे उत्तर दिले.

वेगळे अर्थ काढू नये - अर्जुन खोतकरयासर्व चर्चांवर अर्जुन खोतकर यांनी दिल्ली येथून प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत भेट झाल्याने चर्चा तर होणार आहे. पण मी सध्या शिवसेनेत आहे, असे खोतकर यांनी स्पष्ट केले. पण भविष्यात राहणार का? यावर उत्तर देणे खोतकरांनी टाळले आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरे यांनी खोतकर यांना उपनेतेपद दिले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात देखील खोतकर यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरJalanaजालनाraosaheb danveरावसाहेब दानवेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना