शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आचार्य भानुकवी संमेलनात भरगच्च कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 00:31 IST

अभिजात मराठी भाषा परिषद, आचार्य भानुकविश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारा आयोजित पहिले राज्यस्तरीय ‘आचार्य भानुकवी मराठी साहित्य संमेलन अंबड येथे होते आहे.

अंबड : अभिजात मराठी भाषा परिषद, आचार्य भानुकविश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेद्वारा आयोजित पहिले राज्यस्तरीय ‘आचार्य भानुकवी मराठी साहित्य संमेलन अंबड येथे होते आहे. आद्य कवयित्री महदंबा साहित्यनगरीत पंडित जळगावकर नाट्यगृहात रविवारी आ. राजेश टोपे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रा. शिवाजी हुसे यांची, तर स्वागताध्यक्षपदी दिनेश फोके यांची निवड झाली आहे. संमेलनाला आ. नारायण कुचे, तहसीलदार दत्तात्रय भारस्कर, नगराध्यक्षा संगीता कुचे, डॉ. अशोक देशमाने, डॉ. सुशीला सोलापुरे, डॉ. संजीवनी तडेगावकर, शेख इक्बाल मिन्ने, डी. एन. जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यानिमित्त रविवारी सकाळी सात ते नऊ दरम्यान श्रीपंचकृष्ण ज्ञानआश्रम ठाकूरनगर येथून ग्रंथदिंडीचा प्रारंभ होईल. प्राचार्य डॉ. भागवतराव कटारे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. यावेळी आचार्य भानुकवी वाङ्मय पुरस्कार आणि आद्य कवयित्री महदंबा काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येईल. साडेअकरा ते दीड वाजेच्या दरम्यान 'महानुभाव साहित्यिकांचे मराठी साहित्याला योगदान या विषयावर परिसंवाद होणार असून, अध्यक्षस्थानी डॉ. बळवंत भोयर हे असतील. दुपारी वनिता गायकवाड यांचा 'मी महदंबा बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग होणार आहे. तसेच जागर जाणिवांचा हा समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम डॉ. विनोद जाधव आणि संच सादर करणार आहे. तीन ते पाच या सत्रात महंत विश्वनाथबाबा शेवलीकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. संमेलनास माजी आ. विलास खरात, शिवाजी चोथे, सभापती सतीश होंडे, उपसभापती किशोर नरवडे, उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी आदींची उपस्थिती राहील.