शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पुणे-नागपूर खासगी बस पुलाखाली कोसळली; २० प्रवासी जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

By विजय मुंडे  | Updated: September 26, 2023 11:42 IST

एक खासगी बस (एम. एच.४०- सी. एम.६९६९) ही पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होती.

विजय मुंडे जालना: चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव खासगी बस पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले. यातील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात घडली.

एक खासगी बस (एम. एच.४०- सी. एम.६९६९) ही पुण्याहून नागपूरच्या दिशेने जात होती. ही बस छत्रपती संभाजीनगर ते जालना मार्गावरील मात्रेवाडी (ता. बदनापूर) शिवारात आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाखाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. जखमींमध्ये अमन कुमार (१९ मध्यप्रदेश), अनिता इंगोले (३५), शहाबज खान, रवींद्र राजे (३३), रितेश चंदेल (२३), पराग शिंगणे (४२ नागपूर), निकेल मानिजे (२३ वर्धा), किरण मांटुळे (३८ यवतमाळ), संभाजी सासणे (३२ यवतमाळ), मधुकर पोहरे (४० अमरावती), गणेश भिसे (३७ यवतमाळ), मोहम्मद सैफुद्दीन (३० ), सागर उपाय्या (१९ मध्य प्रदेश), वर्षा नागरवाडे (४०यवतमाळ), शुभम हत्तीमारे (२७ गोंदिया) यांचा समावेश आहे जखमींवर जालना येथील जिल्हा रुग्णालयातील डॉ. उमेश जाधव, डॉ. अनुराधा जाधव व त्यांच्या टीमने उपचार केले.

घटनास्थळी पोलिस बंदोबस्तअपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचे साहित्य बस मध्ये आहे. त्या साहित्याची चोरी होऊ नये यासाठी घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोनि. सुदाम भगवात यांनी दिली.

टॅग्स :Bus DriverबसचालकAccidentअपघातJalanaजालना