शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
3
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
4
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
6
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
7
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
8
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
9
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
10
मालदीवमधील सर्व भारतीय सैनिक माघारी परतले, राष्ट्राध्यक्ष मुइज्जूंनी दिली होती 10 मे ची मुदत
11
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
12
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
13
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
14
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
15
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

'विना टोपीचे डोके चांगले दिसत नाही'; रखरखत्या उन्हात उमेदवारांच्या गावभेटी

By विजय मुंडे  | Published: April 08, 2024 7:25 PM

जालना लोकसभा मतदारसंघात सध्या भाजप आणि वंचितचा उमेदवार जाहीर झालेला आहे.

जालना : एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत आहे. उन्हाचा पारा ४० अंशांवर गेल्याने सकाळी ९ नंतर घराबाहेर निघणेही नको वाटत आहे. अशा रखरखत्या उन्हातच रविवारी (दि.७ ) रावसाहेब दानवे यांनी गावभेटींचा दौरा केला. कुठे ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या डोक्यावर टोपी ठेवत केलेली मिश्किल टिपण्णी. कुठे मयत मुलाच्या वडिलांचे केलेले सांत्वन तर कुठे वाडीवस्तीवरील नागरिकांच्या समस्या जाणून घेत कार्यक्रमांना हजेरी लावली.

जालना लोकसभा मतदारसंघात सध्या भाजप आणि वंचितचा उमेदवार जाहीर झालेला आहे. महाविकास आघाडीत ही जागा कोणाकडे आणि उमेदवार कोण, हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे भाजपचे दानवे, वंचितचे बकले प्रचारात आहेत. रविवारी सकाळी ८ वाजताच दानवे यांचा प्रचार सुरू होतो. जालना येथे तेली समाजबांधवांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांचा ताफा भोकरदनच्या दिशेने निघाला.

भोकरदन येथील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी पिंपळगाव गावातील ज्येष्ठांशी संवाद साधला. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून गावपातळीवरील आढावा घेतला. त्याचवेळी भगवान गावंडे यांच्या डोक्यावर दानवे यांना टोपी दिसली नाही. दानवे यांनी स्वत:ची टोपी काढून त्यांच्या डोक्यावर ठेवत ‘विना टोपीचे डोके चांगले दिसत नाही. तुम्ही पूर्वीही सक्रिय होता आताही सक्रिय व्हा’, असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर लेहा येथील पठाण कुटुंबियाची भेट घेऊन मुलाच्या अपघाती निधनाबाबत शोक व्यक्त केला.

मुंबईतील समस्यांवर भोकरदनमध्ये चर्चाभोकरदन येथील पक्षप्रवेश सोहळ्यात उपस्थित कठोरा बाजार येथील काही युवकांनी मुंबईत आम्ही राहतो, असे सांगत तेथील समस्या मांडल्या.

साहेब, घरकुलाचं तेवढं बघाशेलूद येथील गोसावीवाडी येथील वस्तीवरील नागरिकांशी ‘साहेब, आम्हाला घरकुल मंजूर झालेलं नाही. तेवढं घरकुलाचं बघा’, अशी विनंती केली. त्यानंतर दानवे यांचा ताफा वाढोणा गावाकडे वळाला.

अन् दानवे यांनी डोक्याला बांधला गमजा उन्हाचा पारा ४० अंशावर गेला आहे. भर उन्हात दानवे यांनी रविवारी पिंपळगाव येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. गाडीतून खाली उतरताच उन्हाचा पारा जाणवला. उन्हापासून बचाव करताना दानवे यांनी डोक्याला गमजा बांधला. सोबतच्या कार्यकर्त्यांनाही उन्हापासून बचाव करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

‘वंचित’चे उमेदवारही भेटीलावंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बलके यांनी रविवारी दिवसभरात छत्रपती संभाजीनगर, जालना येथे ठिकठिकाणी भेटी देऊन पदाधिकारी, नागरिकांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी, संजयनगर, जालना शहरा लगतच्या वस्त्यांना भेटी देऊन बकले यांनी संवाद साधला. यावेळी अनेकांनी पाणी, रस्ता यासह इतर समस्या मांडल्या. जालन्याची ओळख उद्योगनगरी म्हणून असली तरी राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षामुळे गरजूंना योजनांपासून वंचित रहावे लागत असल्याच्या समस्याही अनेकांनी मांडल्या. यावेळी बकले यांनी त्या समस्या जाणून घेतल्या.

टॅग्स :Jalanaजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४raosaheb danveरावसाहेब दानवे