शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता दर्पण’साठी ७७९ ग्रा.पं.सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:52 IST

स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी ७७९ ग्रा.पं. सज्ज झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : ‘स्वच्छता दर्पण’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी ७७९ ग्रा.पं. सज्ज झाल्या आहेत. गावातील सर्व कुटुंबांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छाग्रहींच्या मदतीने जनजागृती, स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण व घनकचरा सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे हे उपक्रम प्रामुख्याने तपासण्यात येणार आहेत.शाश्वत स्वच्छतेसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून जनजागृती करण्यावर जिल्ह्याचे गुणांकन होणार आहे.राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता दर्पण ही गुणांकन स्पर्धा असून ३० जुलैपर्यंत सर्वांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, शौचालयाचा वापर शाश्वत स्वच्छतेसाठी स्वच्छाग्रही यांची निवड प्रशिक्षण व स्वच्छागृह सक्रिय करणे याबाबी या स्पर्धेसाठी महत्त्वाच्या असून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत गावात जनजागृती करण्यासाठी रंगरंगोटी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.‘हगणदारीमुक्त गावात आपले स्वागत’ अशा आशयाचे स्वागत फलक व लहान मुलांच्या शौचाचे व्यवस्थापन, शौचालयाचा वापर, शौचालय सर्वांसाठी तसेच घनकचरा व्यवस्थापन हे ४ महत्वाचे चित्रसंदेश गावात रंगवणे गरजेचे आहे.केंद्र शासनाने दिलेला नमुना आकार रंगसंगती प्रमाणे एक स्वागत फलक व चार भिंती रंगवावे. अ‍ॅपच्या मदतीने फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. या आधारेच गुणांकन करण्यात येणार आहे. यासाठी २० गुण आहेत. या कामासाठी व स्वागत फलक तयार करण्यासाठी ७७९ ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.ग्रामसेवक व सरपंच तसेच गावातील पाच महिलांच्या स्वाक्षरीने रंग कामाचा अहवाल पंचायत समितीस दाखल होताच संबंधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर रंगकामाचा निधी वितरित करण्यात येणार आहे. यासाठी जिओ टॅगिंग महत्त्वाची आहे. रंग काम पूर्ण करून केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर फोटो अपलोड करावयाचा आहे. ग्रामसेवक, सरपंच व देखरेख समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन आपले गाव व ग्रामपंचायत राष्ट्रीय स्तरावर गुणांकनात अव्वल आणण्याचे हे प्रयत्न आहेत.८१ ग्रामपंचायतींचा समावेशया स्पर्धेत जालना तालुक्यातील १२४, अंबड तालुक्यात १११, बदनापूर ७९, भोकरदन १२४, घनसावंगी ९६, जाफराबाद ७२, मंठा ९२, परतूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आता खऱ्या अर्थाने चुरस निर्माण होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतgovernment schemeसरकारी योजना