जिल्हा रुग्णालयातील केंद्रावर २२ डॉक्टर, ८२ कर्मचारी अशा एकूण १०४ जणांनी कोरोनाची लस घेतली. भोकरदन ग्रामीण रुग्णालयात ६ डॉक्टर व ५८ कर्मचारी अशा एकूण ६४ जणांनी लस घेतली. मंठा ग्रामीण रुग्णालयात पाच डॉक्टर, १५७ कर्मचारी अशा एकूण १६२ जणांनी लस घेतली. दीपक रुग्णालयात सहा डॉक्टर, २४ कर्मचारी अशा एकूण ३० जणांनी लस घेतली. बदनापूर ग्रामीण रुग्णालयात चार डॉक्टर, ४८ कर्मचारी अशा एकूण ५२ जणांनी लस घेतली. जाफराबाद येथे सहा डॉक्टर, ६१ कर्मचारी अशा एकूण ६७ जणांनी लस घेतली. मिशन हॉस्पिटलमध्ये १५ डॉक्टर, ६८ कर्मचारी अशा एकूण ८३ जणांनी लस घेतली. घनसावंगी ग्रामीण रुग्णालयात तीन डॉक्टर, १०७ कर्मचारी अशा एकूण ११० जणांनी लस घेतली.
१२ जणांना सौम्य त्रास
आजवर जिल्ह्यातील ५६९ डॉक्टर आणि ४४८३ कर्मचारी अशा एकूण ५०५२ जणांना लस देण्यात आली आहे. शुक्रवारी लस घेतलेल्यांपैकी १२ जणांना सौम्य प्रकारचा त्रास जाणवल्याचे सांगण्यात आले.
फोटो