जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत २१ शेतकऱ्यांचा तब्बल ६० एकर ऊस जळाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली.कुंभारझरी परिसरातील एका शेतात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. आग लागताच शेतक-यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर देऊळगाव राजा व भोकरदन येथील अग्निशमन दलाचे बंब बोलाविण्यात आले होते. या आगीत जवळपास ६० एकर ऊस जळून खाक झाला असून, यात शेतक-यांचे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.आधीच परिसरातील शेतकरी दुष्काळाने होरपळून गेले आहेत. त्यात लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी गजानन चव्हाण, प्रयाग चव्हाण, पार्वताबाई चव्हाण, दुर्गा चव्हाण, माधव चव्हाण, प्रकाश चव्हाण, शरद चव्हाण, मनोहर चव्हाण, नामदेव चव्हाण, हरिभाऊ चव्हाण, दामुता चव्हाण, सुभाष चव्हाण, अशोक चव्हाण, रामकृष्ण चव्हाण, राजाराम चव्हाण, साहेबराव चव्हाण, जगन चव्हाण, अनिता चव्हाण यांनी केली आहे.
६० एकरांतील ऊस जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:37 IST