शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

५० लाखांचे पॅकेज डावलून निवडली UPSC; जालन्याचा इंजिनिअर अभिजय पगारेची ८४४ वी रँक

By विजय मुंडे  | Updated: May 24, 2023 12:50 IST

साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून चांगली नाेकरी आहे. परंतु, शासकीय नोकरीतून समाजाची सेवा करण्याची इच्छा आहे

जालना : शहरातील अग्रसेननगर भागातील रहिवासी आणि बंगळूरू येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करीत असलेल्या अभिजय विजय पगारे याने यूपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. यूपीएससीच्या मंगळवारी लागलेल्या निकालात अभिजय पगारे याला ८४४ वी रँक मिळाली आहे.

जालना शहरातील जेईएस महाविद्यालयातील उपप्राचार्य विजय पगारे यांचा मुलगा अभिजय पगारे याचे १२ वी पर्यंतचे शिक्षण जालना शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये झाले. त्यानंतर एनआयटी वारंगल येथे त्याने कॉम्पयुटर सायन्समध्ये पदवी मिळविली. पदवी मिळाल्यानंतर अभिजय पगारे याने बंगळूरू येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर अभियंता म्हणून नाेकरी स्वीकारली. वार्षिक ५० लाख रूपयांचे पॅकेज असतानाही अभिजय पगारे याने आयएसएस हाेण्याचे स्वप्न पाहत गत चार वर्षापासून दैनंदिन ८ तासाची नाेकरी करून यूपीएससीची तयारी केली. 

पहिल्या प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोहोचला होता. परंतु, त्याला त्यावेळी अपयश आले. परंतु, हार न मानता आयएएस व्हायचे या हेतूने त्याने अभ्यासातील सातत्य कायम ठेवले. चालू वर्षात यूपीएससीची परीक्षा दिली आणि मंगळवारी लागलेल्या यूपीएससीच्या निकालात त्याने ८४४ वी रँक मिळविली आहे. प्राप्त रँकनुसार इंडियन फॉरेन सर्व्हिस किंवा इंडियन रेव्ह्यून्यू सर्व्हिस मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. अभिजय पगारे याच्या या यशाबद्दल जालना शहरासह जिल्हाभरातून त्याचे कौतुक केले जात आहे.

अन् पालकांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रूअभिजय पगारे हा गत चार वर्षापासून यूपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. पहिल्या प्रयत्नात त्याला अपयश आले होते. परंतु, दुसऱ्या प्रयत्नात त्याने यश मिळविले. अभिजय पगारे याने युपीएससीत यश मिळाल्याची माहिती मिळाली त्यावेळी त्याचे वडिल विजय पगारे, आई कविता पगारे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले होते.

शासकीय सेवेतून समाज सेवासाॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून चांगली नाेकरी आहे. परंतु, शासकीय नोकरीतून समाजाची सेवा करण्याची आवड आहे. त्यामुळे मी प्रारंभीपासूनच आयएसए होण्याचे स्वप्न पाहत यूपीएससीची तयारी केली. आज यश मिळाल्याचे समाधान आहे. शिवाय आयएसएस होण्यासाठी आपले प्रयत्न कायम राहणार आहेत.- अभिजय पगारे, जालना

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगJalanaजालना