बाधितांमध्ये जालना शहरातील २२२, तर तालुक्यातील खामवाडी ३, जामवाडी ११, पळसखेड १, गोंदेगाव २, निरखेडा १, खरपुडी १, पिंपळगाव १, कानचनवाडी १, भेलपूर १, पीरकल्याण १, वाढोणा १, माडंवा १, रेवगाव ३, वाकुळणी १, अंतरवाला १, कोब्रेवाडी १, सोमनाथ जळगाव १, गोलापांगरी १, मोतीगव्हाण २, वडगाव १, लोधेवाडी १, मालशेंद्रा १, कारला २, सिंधी काळेगाव १, सावरगाव १, दे. काळेगाव १, डुकरी पिंपरी येथील एकास कोरोनाची लागण झाली. मंठा शहरातील २२, तर तालुक्यातील हेलसवाडी २, मोला १, लिंबेवाडी १, विडोळी १, पाडळी १, मंगरूळ १, देवगाव खवणे १, हिलस १, टोकवाडी १, सावरगाव वायाळ येथील एकास कोरोनाची बाधा झाली. परतूर तालुक्यातील परतूर शहर १५, हातडी २, आष्टी १, दहीफळ भोगणे १, वाटूर फाटा १, खंदारी १, कराहाळा १, कराड १, सावंगी १, पारदगाव १, रायपूर ३, वाढोना २, कथला तांडा येथील चौघांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर ७, चापडगाव १, राणी उंचेगाव ४, कुंभारी पिंपळगाव ४, रामसगाव १, मंगरूळ १, गुरुपिंपरी १, मांगू जळगाव १, बचेगाव १, तळेगाव १, कंदारी येथील एकास कोरोनाची लागण झाली. अंबड शहरातील ७, तर तालुक्यातील मासई तांडा १, सिरवी १, चिंचखेड ३, जामखेड १, वडीगोद्री येथील ७ जणांना कोरोनाची बाधा झाली. जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद शहर ११, गणेशपूर १, टेंभुर्णी १, सावंगी १, कुंभारझरी २, वरखेडा १, चिंचखेडा १, बरामपुरी १, कोल्हापूर १३, चापनेर १, येवता येथील दोघांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अलगीकरण केंद्रात २१० जण
संस्थात्मक अलगीकरण केंद्रात २१० जणांना ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर नियमित उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. यात राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर बी ब्लॉक ६१, राज्य राखीव पोलीस बल क्वाॅर्टर सी ब्लॉक २१, शासकीय तंत्रनिकेतन अंबड ७३, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर १८, के.जी.बी.व्ही. घनसावंगी १७, तर जाफराबाद येथील आयटीआय कॉलेजमध्ये तिघांना ठेवण्यात आले आहे.