शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

जालना जिल्हाभरात तीन वर्षात साडेचार हजार घरकुलांचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:21 IST

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०१६-१७ ते २०१८-१९ या दरम्यानच्या तीन वर्षात एकूण ५ हजार ८६१ घरकुलांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी आजवर ४ हजार ९४२ घरकुलांची कामे पूर्ण झाली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०१६-१७ ते २०१८-१९ या दरम्यानच्या तीन वर्षात एकूण ५ हजार ८६१ घरकुलांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी आजवर ४ हजार ९४२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, अद्यापही ९१९ घरकुलांचे काम अपूर्ण आहेत.सर्वसामान्य गरीब कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना अंमलात आणली. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्याला १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. हे अनुदान शासनाकडून चार टप्प्यात दिले जाते. या योजनेंतर्गत जालना जिल्ह्यात दरवर्षी घरकूल बांधकामांना मंजुरी प्रदान करण्यात येते. शिवाय शासनाकडूनच जिल्ह्याला घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट दरवर्षी मिळत असते.२०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षाच्या कालावधीत जिल्ह्याला एकूण ५ हजार ९५८ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रशासनातर्फे ५ हजार ८६१ घरकूल बांधकामांना मंजुरी प्रदान करण्यात आली.त्यापैकी ४ हजार ९४२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, ९९१ घरकूलांचे काम अद्यापही अपूर्णच असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी सूर पसरला आहे.२०११ साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात १२ हजार ३४६ कुटूंब या योजनेसाठी पात्र होते. मात्र, ५ हजार ८४८ कुटुंबांनाच मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना पात्र असूनही घरकूल मिळाले नाही. त्यांना २०१९-२० या वर्षी घरकूल देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Homeघरgovernment schemeसरकारी योजनाPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना