शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

४०८ गोठ्यांच्या कामांची मान्यता रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:30 IST

येथील पंचायत समिती कार्यालयाने मग्रारोहयो अंतर्गत प्रशासकीय मंजुरी दिलेल्या ७०८ सिंचन विहिरींसह ४०८ जनावरांच्या गोठ्यांच्या कामांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे.

बदनापूर : येथील पंचायत समिती कार्यालयाने मग्रारोहयो अंतर्गत प्रशासकीय मंजुरी दिलेल्या ७०८ सिंचन विहिरींसह ४०८ जनावरांच्या गोठ्यांच्या कामांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. प्रकरण चौकशीच्या फे-यात आल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली आहे.तालुक्यात समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत अकरा कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यामधे प्रत्येक गावाला सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे अशा विविध कामांचा समावेश होता. या कामांकरिता लाभार्थी निवडण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव स्वीकारण्याचे आदेश होते. मंगळवारी छाननी समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात छाननी समितीची बैठक झाली. त्यामधे ७०८ सिंचन विहिरी, ४०८ जनावरांचे गोठे या कामांना दिलेली प्रशासकीय मंजुरी रद्द करण्यात आली. तालुक्यात उद्दिष्टांपेक्षा जास्त कामे मंजूर करण्यात आली, छाननी समितीची मान्यता नाही, प्राधान्य क्रमाचे पालन केले नाही, १८ गावातील एकही विहीर मंजूर केली नाही, क्षेत्र कमी जास्त असलेल्यांनाही विहिरी मंजूर केल्याचा ग्रामपंचायत ठराव नसणे, ठरावांसोबत भूजल सर्वेक्षणाचे प्रमाणपत्र नसणे इ. कारणांमुळे समितीने कामांची मान्यता रद्द केली आहे.------------कारवाईची भीतीतालुक्यात मग्रारोहयोची कामे सुरू करण्याकरिता सरपंच संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. पंचायत समितीच्या मासिक बैठकीतही विद्यमान गटविकास अधिकारी मग्रारोहयोची कामे सुरू करीत नसल्याचा आरोप करून त्यांच्या बदलीचा ठराव संमत झाला होता. त्यामुळे आता छाननी समितीच्या या निर्णयाचा तालुक्यात काय परिणाम होईल, हे आगामी समोर येणार आहे. तसेच नियम डावलून प्रशासकीय मान्यता देणा-या अधिका-यांवर काय कारवाई होते, यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे....................छाननी समितीने ज्या कामांची प्रशासकीय मान्यता रद्द केली, ती कामे नियमात बसवून सुरू करायला हवी होती. आता पुन्हा ही प्रक्रिया नव्याने करण्यात वेळ जाणार आहे. अनेक गावांमध्ये लोकांना रोजगार हवा असताना अधिकारी वेळकाढू धोरण राबवीत आहेत. त्यामुळे छाननी समितीच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल.- राम पाटील, अध्यक्ष- तालुका सरपंच संघटना, बदनापूर.