शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जालना अनुदान वाटप घोटाळ्यात आणखी ७ तलाठ्यांसह ४ सहायक महसूल कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:17 IST

३५ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशीसाठी शिफारस, तहसीलदार व नायब तहसीलदारांचा अहवाल शासनास सादर

जालना : शेतकरी अनुदान वाटप घोटाळा उघड झाल्यानंतर ८९ कर्मचारी चौकशीत दोषी आढळले आहेत. यात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांचा समावेश असल्याचे उघड झाले होते. मागील आठवड्यात प्रशासनाने १० तलाठ्यांचे निलंबन केले होते. गुरुवारी पुन्हा ७ तलाठी, ४ सहायक महसूल कर्मचारी अशा ११ कर्मचाऱ्यांचे निलंबन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. यामुळे निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २१ झाली आहे. तसेच ३५ तलाठ्यांची विभागीय चौकशी सुरू झालेली आहे. ५ तहसीलदार व ६ नायब तहसीलदारांवर कारवाई करण्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात बनावट शेतकरी दाखवून, तसेच जमीन नसताना आणि एकाच नावावर दोनदा अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला होता. जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत अतिवृष्टी आणि गारपिटीच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर अनुदानात सुमारे ४२ कोटींचा अपहार केल्याप्रकरणी यापूर्वी १० तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

समितीच्या अहवालात दोषी आढळलेल्या तलाठ्यांना लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते, ज्यात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मागील आठवड्यात १० तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, चौकशी समितीकडून इतर खुलासे तपासण्यात येत आहेत. यानंतर गुरुवारी पुन्हा ७ तलाठी व ४ सहायक महसूल अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईने गैरप्रकार करणाऱ्या इतरांचेही धाबे दणाणले आहेत.

आजी-माजी तहसीलदारांना नोटीसघोटाळाप्रकरणी अंबड व घनसावंगी तालुक्यातील आजी-माजी पाच तहसीलदार व सहा नायब तहसीलदारांना नोटीस बजावण्यात आलेली होती. अधिकाऱ्यांचे खुलासे प्रशासनास सादर केलेले आहेत. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी अहवाल प्रशासनाकडून शासनास सादर करण्यात आला असून अधिकाऱ्यांवर शासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

विभागीय चौकशीनंतर गुन्हे दाखल होणारघोटाळ्याच्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या ३५ तलाठ्यांची विभागीय चौकशी करण्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. विभागीय चौकशीनंतर या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

‘या’ कर्मचाऱ्यांचा समावेशगुरुवारी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सो.पिंपळगाव येथे सध्या कार्यरत असलेले तलाठी डी.जी. कुरेवाड, डोमगावचे येथील तलाठी सचिन बागूल, तीर्थपुरीचे तलाठी राजू शेख, बाजी उम्रदचे तलाठी एस.एस. कुलकर्णी, बोधलापुरीचे तलाठी एस.एम. जारवाल, मूर्तीचे तलाठी डी.जी.चांदमारे, कुंभाझरीच्या मंडळ अधिकारी ज्योती खर्जुले यांच्यासह मंठा तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी आर.बी. माळी, घनसावंगी तहसील कार्यालयात कार्यरत असलेले सहायक महसूल अधिकारी आशिष पैठणकर, अंबड तहसील कार्यालयातील सहा.महसूल अधिकारी सुशील जाधव, घनसावंगी तहसील कार्यालयातील व्ही.डी.ससाने यांचा समावेश आहे.

अहवाल शासनास सादरमागील आठवड्यात १० तलाठ्यांना निलंबित केल्यानंतर आज पुन्हा ७ तलाठी व ४ सहायक महसूल अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. तसेच ३५ तलाठ्यांची विभागीय चौकशीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. घोटाळ्यात दोषी आढळलेले तहसीलदार व नायब तहसीलदारांवर कारवाई करण्याचा अहवाल शासनास सादर करण्यात आलेला आहे.- डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना.

टॅग्स :JalanaजालनाfraudधोकेबाजीRevenue Departmentमहसूल विभाग