शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरात आजपासून ३५ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:29 IST

जालना शहरात आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवारी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा प्रख्यात विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनादरम्यान परिसंवाद, लेखक, वाचक व संवाद, कविसंमेलन, कथाकथन आदीं कार्यक्रम-उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.संजय लाखे पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देसंजय लाखे पाटील : साहित्यप्रेमी जनतेसह नागरिकांनी उपस्थित रहावे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहरात आयोजित ३५ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवारी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा प्रख्यात विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनादरम्यान परिसंवाद, लेखक, वाचक व संवाद, कविसंमेलन, कथाकथन आदीं कार्यक्रम-उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.संजय लाखे पाटील यांनी दिली.याबाबात अधिक माहिती देतांना डॉ.लाखे पाटील पुढे म्हणाले की, जालना शहरातील मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात हे अस्मितादर्श साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनस्थळाला पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह असे नाव देण्यात आले आहे.शनिवार, या साहित्य संमेलनास संविधान रॅलीने सुरुवात होणार आहे. ही संविधान रॅलीस सकाळी ८ वाजता मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ होणार असून, संमेलनस्थळी तिचा समारोप होणार आहे.सकाळी ९ वाजता डॉ.सुखदेव थोरात यांच्या हस्ते अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मागासवर्गीय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, प्रसिध्द कवी प्रा. फ. मु. शिंदे, जालना शहराच्या नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल, जालना नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश राऊत आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उदघाटन सोहळ्यात स्मरणिका व ग्रंथ प्रकाशनासह पुरस्काराचे वितरणही मान्यवर अतिथींच्या हस्ते होणार आहे.दुपारी १ ते ३.३० दरम्यान पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे बहुआयामी सांस्कृतिक व्यक्तिमत्व या विषयावर डॉ. चिंतामण कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात डॉ. मिलिंद बागुल, सुरेश साबळे, डॉ. वासुदेव मुलाटे, शत्रुघ्न जाधव, डॉ. इसादास भडके, डॉ. सुशिला मुल-जाधव, प्रेमानंद गज्वी, डॉ. केशव देशमुख, डॉ. संपतराव गायकवाड, निलकांत चव्हाण, विश्वास वसेकर, वसंत शेंडे आदी मान्यवर वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.यावेळी अ‍ॅड. बी. एम. साळवे, सुभाष देविदान व डॉ. संजय राख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.दुपारी ३.३. 0ते सायं. ५.३० दरम्यान भारतीय संविधान आणि वर्तमान संदर्भ या विषयावर प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात डॉ. रा. का. क्षीरसागर, डॉ. निलकंठ शेरे, डॉ. अनंत राऊत, डॉ. श्रीराम निकम, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. वसंत डोंगरे, महेंद्र ताजणे, डॉ. प्रविण मोरे, डॉ. मा. प. थोरात, दीपकराज कापडे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. यावेळी अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, डॉ. नारायण मुंढे, जयेश बाविसी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे लाखे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाAsmitadarsh Sahitya Sammelanअस्मितादर्श साहित्य संमेलन