शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

भोकरदनचे ३३८ नागरिक अडकले परराज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:27 IST

भोकरदन तालुक्याचे ३३८ मजूर परराज्यात तर १ हजार १९९ मजूर हे परजिल्ह्यांत अडकले असल्याचे प्रशासनाने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : परराज्यांतून व परजिल्ह्यांतून कामासाठी आलेल्या मजुरांना अन्नधान्य पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रशासनाच्यावतीने गावनिहाय मजुरांची गणना करण्यात येत आहे. त्यामध्ये परराज्यांतील १८३ तर परजिल्ह्यांतील २६९ मजूर हे भोकरदन तालुक्यात अडकले आहेत. भोकरदन तालुक्याचे ३३८ मजूर परराज्यात तर १ हजार १९९ मजूर हे परजिल्ह्यांत अडकले असल्याचे प्रशासनाने सांगितले.जगात कोरोनाने दहशत निर्माण केल्यानंतर सरकारने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहरासह ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. शिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी संचारबंदी देखील लागू करण्यात आली. त्यामुळे अनेकजण परराज्यात तर काही जण परजिल्ह्यात अडकले आहेत. अशा नागरिकांना दररोजचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अडकलेल्या मजुरांना अन्नधान्य देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. इतर राज्यात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संबंधित राज्य सरकारांशी चर्चा केली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी परराज्यात व परजिल्ह्यांत अडकलेल्या व आपल्या जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांची गणना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भोकरदन तालुक्यात परराज्यातील १८३ तर परजिल्ह्यांतील २६९ मजूर अडकले आहेत. तालुक्याचे ३३८ मजूर परराज्यांत तर १ हजार १९९ मजूर हे परजिल्ह्यांत अडकले असल्याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.अहवाल तात्काळ देण्याचे होते आदेशजिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मजुरांची गणना करून तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अवाहल तयार करण्यात आला असून, तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यात १ फेब्रुवारी ते २६ मार्च यादरम्यान विविध आजार किंवा वृद्धापकाळाने १८५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये १०६ पुरुष तर ७९ महिलांचा समावेश आहे. २ ते २५ वयोगटातील २५, १७ ते ५० वयोगटातील १६५ जणांचा मृत्यू झाला असल्याचे तालुका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :LabourकामगारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना